Google भारतीय कंपन्यांकडून खेरदी करणार कार्बन क्रेडिट; जाणून घ्या, कार्बन क्रेडिट म्हणजे नक्की काय?
Carbon credit : हवेतील कार्बन डायऑक्साईडचे (Carbon dioxide) प्रमाण दिवसेंदिवस वाढतेय. त्यामुळे प्रदुषणातही भर पडत चालली. अशातच जगातील सर्वात मोठी कंपनी गुगलने (Google) कार्बन डायऑक्साइड काढून टाकण्यासाठी भारतातील वराह नावाच्या स्टार्टअपसोबत करार केलाय. या कराराबाबत गुगलने सांगितलंय की, ते वराह स्टार्टअपकडून कार्बन क्रेडिट्स खरेदी करतील. दरम्यान, गुगल आणि वराह यांच्यातील करार हा बायोचारशी संबंधित आतापर्यंतचा सर्वात मोठा करार असल्याचे म्हटले जातंय. याच पार्श्वभूमीवर आपण आपण कार्बन क्रेडिट (Carbon credit) म्हणजे काय? याच विषयी जाणून घेऊ.
शरद पवारांना मोठा धक्का! बडा नेत्याचा लवकरच अजित पवार गटात प्रवेश; कारण काय?
अनेक तंत्रज्ञान कंपन्या वातावरणात कार्बन डायऑक्साईड सोडत असतात. त्यामुळं पृथ्वीचे तापमान वाढतेय. यावर तोडगा काढण्यासाठीच जगभर विचारमंथन सुरू असतांनाच कार्बन क्रेडिट हा पर्याय पुढं आला…
कार्बन क्रेडिट म्हणजे काय?
कार्बन क्रेडिट्स ही अशी प्रणाली आहे, जी हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी किंवा काढून टाकण्यासाठी वापरली जाते. ग्लोबल वार्मिंगला बळी पडलेल्या पर्यावरणाला मदत करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन कमी करणं हे कार्बन क्रेडिटचे उद्दिष्ट आहे. या कार्बन क्रेडिटला कार्बन ऑफसेट असंही म्हणतात. कारण ते कार्बन उत्सर्जन कमी करतात. एक कार्बन क्रेडिट म्हणजे एक मेट्रिक टन कार्बन डायऑक्साइड किंवा इतर हरितगृह वायू. या कार्बन क्रेडिट्सचा व्यवहार बहुतेकदा कार्बन मार्केटमध्ये केला जातो.
तंत्रज्ञान जगतातील अनेक कंपन्या स्वतः कार्बन क्रेडिट्स खरेदी करत आहेत. उदाहरणार्थ, फेसबुकने २०२० पर्यंत कार्बन न्यूट्रल होण्याचे वचन दिले. फेसबुक २०११ पासून उत्सर्जन कमी करण्यासाठी कार्बन क्रेडिट्स खरेदी करत आहे. गुगल २००७ पासून कार्बन क्रेडिट्स देखील खरेदी करत आहे… थोडक्यात, ज्या कंपन्यांचे कार्बन उत्सर्जन जास्त आहे, त्या कंपन्या कार्बंन क्रेडिट खरेदी करतात. त्यामुळं कार्बन उत्सर्जनामुळं कंपनी सरकारला जो दंड भरत असते, त्यातून कंपनीला सूट मिळते.
Auto Expo 2025 : क्लासिक फिचर्स अन् पावरफुल इंजिनसह देशात आली पहिली सीएनजी स्कूटर
आता गुगलने वराहसोबत करार केला. वराहकडून गुगल १ लाख टन कार्बन क्रेडिट खरेदी करणार आहे.दरम्यान, वराह स्टार्टअप मोठ्या प्रमाणात शेतीतील कचरा बायोचारमध्ये रूपांतरित करतेय. बायोचार हा प्रत्यक्षात कोळशाचा एक प्रकार आहे, जो वातावरणातून कार्बन डायऑक्साइड काढून टाकतो आणि तो मातीत परत मिसळवतो.
बायोचार कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन कमी करण्यासाठी शाश्वत पर्याय
हवेतून कार्बन डायऑक्साइड शोषून घेण्यासाठी बायोचार हा एक चांगला पर्याय आहे. वराह आणि गुगल यांच्या उपक्रमांतर्गत, वराह भारतातील शेकडो लहान शेतकऱ्यांकडून कचरा खरेदी करेल आणि त्याचे बायोचारमध्ये रूपांतर करण्यासाठी अणुभट्ट्या बांधेल. त्यामुळं शेकडो वर्षे कार्बन डायऑक्साइड साठवून ठेवण्यास मदत होणार आहे. खतांना पर्याय म्हणून शेतकऱ्यांनाही ते पुरवले जाईल.
दरम्यान, जेव्हा एखादी कंपनी कार्बन क्रेडिट खरेदी करते तेव्हा ती वातावरणात एक मेट्रिक टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित करण्याचा अधिकारच खरेदी करत असते. कार्बन क्रेडिट्स खुल्या बाजारातून खरेदी करता येतात किंवा उत्सर्जन कमी करणाऱ्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करून मिळवता येतात. कार्बन क्रेडिट्स विकून मिळणारे पैसे एका निधीत जातात. हा निधी हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करणाऱ्या प्रकल्पांमध्ये वापरला जातो. या कंपन्यांनी उचललेल्या अशा पावलांमुळे जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल काही प्रमाणात रोखता येतील.