डॉ. मनमोहन सिंग हे कायम निळ्या रंगाची पगडी का घालत असत?, काय सांगितलं होतं कारण?

Dr. Manmohan Singh : भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम अर्थतज्ज्ञ अशी मनमोहन सिंग यांची ख्याती होती. (Manmohan Singh ) देशाच्या पंतप्रधान पदी विराजमान झालेले ते पहिले शीख पंतप्रधान होते. २००४ ते २०१४ अशी दहा वर्षे त्यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून काम केलं. मनमोहन सिंग यांच्या डोक्यावर कायम निळी पगडी असे. यामागे एक खास कारण होतं. त्यांनी स्वतः ते कारण सांगितलं होतं.
Manmohan Singh यांची देशाच्या राजकारणात एन्ट्री कशी झाली? पाहा व्हिडिओ
डॉक्टरेट ऑफ लॉ
२००६ या वर्षी मनमोहन सिंग यांना केम्ब्रिज युनिव्हर्सिटीत ‘डॉक्टरेट ऑफ लॉ’ ही पदवी देण्यात आली. यावेळी डॉ. मनमोहन सिंग यांनी आपण निळी पगडी का घालतो, याविषयी मनमोहन सिंग यांनी सांगितलं होतं. ही आठवण आजही लोकांच्या स्मरणात आहे. गुरुवारी मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याच रुग्णालयात त्यांची प्रकृती आणखी बिघडली आणि गुरुवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
स्वतःच सांगितलं होतं कारण
डॉ. मनमोहन सिंग यांनी सांगितले होते की, जेव्हा ते ‘केम्ब्रिज’मध्ये शिकत होते तेव्हा ते निळी पगडी घालायचे. यावरून त्यांच्या मित्रांनी त्यांचे नाव ‘ब्ल्यू टर्बन’ असे ठेवले होते. डॉ. मनमोहन सिंग सांगतात की, निळ्या रंगाची पगडी घालण्यामागे कोणतेही विशिष्ट कारण नाही. त्यांना निळा रंग खूप आवडतो म्हणून ते निळ्या रंगाची पगडी घालतात. एवढ्या वर्षांनंतर आजही मनमोहन सिंग निळीच पगडी घालायचे. त्यांची ही आठवण कायम स्मरणात राहिल यात शंकाच नाही. वयाच्या नव्वदीत असताना मनमोहन सिंग हे व्हील चेअरवर राज्यसभेच्या कामकाजाला उपस्थित राहिले होते. त्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता.