वाद पेटला! दिल्लीतील कॉलेजला सावरकरांऐवजी मनमोहन सिंग यांचे नाव द्या, कॉंग्रेसचे थेट PM मोदींना पत्र

वाद पेटला! दिल्लीतील कॉलेजला सावरकरांऐवजी मनमोहन सिंग यांचे नाव द्या, कॉंग्रेसचे थेट PM मोदींना पत्र

NSUI Demand To Change Name Of College: देशात पुन्हा एकदा वीर सावरकर (Veer Savarkar) यांच्यावरून भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) यांच्यात वाद उभा राहिला. दिल्ली विद्यापीठातील एका कॉलेजला वीर सावरकरांचे नाव देण्याचा प्रस्ताव पुढं आला. या निर्णयाला काँग्रेसने विरोध केला. नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) ने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पत्र लिहून प्रस्तावित नवीन महाविद्यालयाचे नाव बदलण्याचे आवाहन केले.

धक्कादायक! घरगुती खरेदीसाठी सरकारी तिजोरीच केली साफ, महानगरपालिकेच्या आयुक्ताचा प्रताप 

या कॉलेजला सावरकरांऐवजी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे नाव देण्याची मागणी कॉंग्रेसने केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दिल्ली विद्यापीठाच्या दोन नवीन कॅम्पस आणि एका महाविद्यालयाचे भूमिपूजन केलं. या नवीन महाविद्यालयाला वीर सावरकरांचे नाव देण्यात येणार असल्याचे समोर आल्यानंतर काँग्रेसच्या युवक संघटनेने त्यावर आक्षेप घेतला. एनएसयूआयचे राष्ट्रीय अध्यक्ष वरुण चौधरी यांनी मोदींना एक पत्रात लिहिलं. या पत्रात डॉ.मनमोहन सिंग यांनी शिक्षण आणि प्रशासन यात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची आठवण करून दिली. फाळणीपासून ते जागतिक नेता बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. मनमोहन सिंग यांची शैक्षणिक पार्श्वभूमी खूप मोठी आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत शिक्षण हक्क कायदा आणि केंद्रीय विद्यापीठ कायदा आणला. नवी महाविद्यालयाला त्यांचे नाव देणं हीच त्यांना आदरांजली ठरेल, यातून येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा मिळेल, असं या पत्रात म्हटलं.

लाभार्थी महिला अपात्र ठरणार! राज ठाकरेंचा महायुतीवर निशाणा, ‘निवडणुकीच्या आधी लाडक्या असणाऱ्या बहिणी आता…’ 

डॉ.मनमोहन सिंग यांनी स्वतः डीयूमध्ये दीर्घकाळ अध्यापन केले. या महाविद्यालयाला मनमोहन सिंग यांचे नाव द्यावे.तसेच देशातील अनेक पंतप्रधानांच्या नावावर केंद्रीय विद्यापीठ आहे, त्यांच्या नावावरही केंद्रीय विद्यापीठ उघडले पाहिजे, असं या पत्रात म्हटलं.

मनमोहन सिंग यांच्या कामगिरीचा आणि योगदानाचा अभ्यासक्रमात समावेश करावा, असंही कॉंग्रेस म्हटलं.

सावकरांकचे इंग्रजांसोबत काय संबंध होते हे देशाला ठाऊक…
तर भाजप फक्त फित कापण्याचं काम करतेय. गेल्या 11 वर्षात भाजप सरकारने सावरकरांच्या नावाने एकही योजना केलेली नाही. सावकरांकचे इंग्रजांसोबत काय संबंध होते, हे देशाला माहिती आहे, असं विधान काँग्रेसचे प्रवक्ते आलोक शर्मा यांनी केलं.

सावरकरांचा दिल्लीशी संबंध काय?
तर काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी म्हणाले, सावरकरांचा दिल्ली आणि परिसराशी काहीही संबंध नाही. दिल्लीत अनेक क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसेनानी होऊन गेले आहेत. दिल्ली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप ध्रुवीकरणाचा विचार करत आहे. कॉलेजला मनमोहन सिंग यांचे नाव द्यावे. ते उत्तम शिक्षणतज्ज्ञही होते, असं तिवारी म्हणाले.

नवीन महाविद्यालयाचा 140 कोटी अंजाजित खर्च…
दरम्यान, दिल्लीतील नवीन महाविद्यालय नजफगडमध्ये बांधले जाणार आहे. विद्यापीठाच्या पश्मिमी कॅम्पसपासून कॉलेज 5 मिनिटांच्या अंतरावर असेल. या महाविद्यालयाच्या बांधकामासाठी अंदाजे 140 कोटी रुपये अंदाजित खर्च आहे. या नव्या महाविद्यालयात 24 वर्गखोल्या, 8 ट्युटोरियल रूम, एक कॅन्टीन, 40 फॅकल्टी रूम, लायब्ररी आणि कॉन्फरन्स रूम अशा सुविधा असतील.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube