धक्कादायक! घरगुती खरेदीसाठी सरकारी तिजोरीच केली साफ, महानगरपालिकेच्या आयुक्ताचा प्रताप

धक्कादायक! घरगुती खरेदीसाठी सरकारी तिजोरीच केली साफ, महानगरपालिकेच्या आयुक्ताचा प्रताप

Municipal Corporation Commissioner Buy Household Items Worth rs 14 to 45 Lakh : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) महानगरपालिका आयुक्ताचा कारनामा उघड झालाय. एकीकडे सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारी तिजोरीत खडखडात असल्याची बोंबाबोंब केली जाते. तर दुसरीकडे महानगरपालिका आयुक्त (Municipal Corporation Commissioner) जी श्रीकांत यांनी तब्बल 14.45 लाख रुपयांच्या घरगुती वस्तू दीड वर्षामध्ये खरेदी केल्या आहेत, त्या देखील महानगरपालिकेच्या तिजोरीतून.

आयुक्त जी श्रीकांत यांनी सरकारी तिजोरीतून विमबार, साबण, गुड नाईट लिक्विड ते 8 हजाराची डस्टबिनपर्यंत खरेदी केलीय. झाडू आणि चमचे देखील सरकारी तिजोरीतून खरेदी करण्यात आल्याचं समोर (Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation) आलाय. आयुक्तांचा हा कारनामा आमदार प्रशांत बंब यांनी मागवलेल्या माहितीतून उघड झालाय.

अजित पवारांना अडकवण्याचा कराडचा प्लान होता का?, बजरंग सोनावणेंचा खळबळजनक दावा

आमदार प्रशांत बंब यांचे गंभीर आरोप

यासंदर्भात बोलताना आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) म्हणाले की, कपड्याचे साबण, भांड्याचे साबण, झाडू, चमचे, हिट, कपडे धुण्याची पावडर, चाकू या जीवनाश्यक वस्तू खरेदी केल्यात. 9800 रूपये किंमत असलेले असे सात गालीचे घेण्यात आलेत. डोअर मॅटची प्रत्येकी किंमत 2400 रूपये आहे. दोन डस्टबिनची किंमत 7995 रूपये आहे. तर 3190 रूपयांचे दोन कप सेट घेण्यात आलेत. प्रत्येकी 7999 किंमत असलेले दोन बेडशीट घेण्यात आलेत. तसेच अठरा हजार पाचशे पन्नास रूपये किमतीच्या तीन बेडशीट खरेदी करण्यात आळ्यात. सहा टॉवेल 1250 रूपयांचे, तर दोन डिनर सेट 9400 रूपयांचे, अशी खरेदी मागील वर्षात झालीय. कोणतंही टेंडर न काढता ही खरेदी करण्यात आल्याचं प्रशांत बंब यांनी स्पष्ट केलंय.

“वाकीफ कहां जमाना हमारी..”, भुजबळांकडून फडणवीसांचं कौतुक अन् शुभेच्छा

आरोपांनंतर महापालिका आयुक्त काय म्हणाले?

याबाबत महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांची प्रतिक्रिया आलीय. या वस्तू मी खरेदी केलेल्या नाहीत. त्यामुळे ज्यांनी कोणी ही खरेदी केलीय, त्यांची चौकशी करणार असून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. त्यावेळी मी नव्हतो, असं देखील स्पष्टीकरण महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांनी दिलंय.

महानगरपालिकेच्या तिजोरीत एकीकडे खडखडाट आहे. छोट्या-छोट्या वस्तूंसाठी देखील महानगरपालिकेकडे पैसा नाही. तर दुसरीकडे महापालिकेच्या दालनातून कोट्यवधी रुपयांची उधळण करण्यात आलीय. महानगरपालिकेच्या आयुक्तांनी या वस्तू मागवल्या नसल्याचं स्पष्ट केलंय. मग नेमकं कोणी या वस्तू मागवल्या? असा प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळं आता या प्रकरणात काय कारवाई होते? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube