प्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर विवेक बिंद्रावर गुन्हा दाखल; पत्नीला मारहाण केल्याचा आरोप

  • Written By: Published:
Letsupp Image   2023 12 23T111030.928

FIR Against Motivational Speaker Vivek Bindra : सुप्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर विवेक बिंद्रावर (Vivek Bindra) गुन्हा दाखल करण्यात आला असून, पत्नीला मारहाण केल्याचा आरोप विवेक यांच्यावर ठेवण्यात आला आहे. गेल्या 6 डिसेंबर रोजी विवेक आणि यानिका यांचा विवाह झाला होता. लग्नाला काही तास उलटत नाही तोच 7 डिसेंबर रोजी पहाटे वादाला सुरूवात झाली. यात मध्यस्थी करणाऱ्या यानिकाला विवेक यांनी मारहाण केली. यानिका बिंद्रा यांचा भाऊ वैभव क्वात्रा याने दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी विवेक यांच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

Manoj Jarange : उद्या अल्टिमेटम संपणार, आज बीडमध्ये निर्णायक सभा; शाळा बंद

प्रकाशित वृत्तांनुसार आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना नोएडाच्या सेक्टर 94 मधील सुपरनोव्हा वेस्ट रेसिडेन्सीमध्ये घडली असून, 7 डिसेंबरच्या पहाटे, बिंद्रा आणि त्यांची आई प्रभा यांच्यात जोरदार भांडण झाले. यावेळी यानिका मध्यस्थी करण्यास गेल्या असता विवेक यांनी तिला मारहाण करत तिला शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मारहाणीत यानिका यांच्या कानाच्या पडद्यावा दुखापत झाली असून, नीट ऐकू येत नसल्याचेही तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.

Ajit Pawar : ‘नियम मोडला, कारवाई तर होणारच’; सुळेंच्या निलंबनावर अजितदादांचं परखड भाष्य

कोण आहे विवेक बिंद्रा

विवेक बिंद्र हे प्रसिद्ध मोटिव्हेश्नल स्पीकर असून, बडा बिझनेस प्रायव्हेट लिमिटेडचे (BBPL) ते CEO असून, त्यांवा YouTube आणि Instagram वर लाखो लोक फॉलो करतात. काही दिवसांपूर्वीच यूट्यूबर असलेल्या संदीप महेश्वरी (Sandeep Maheshwari) यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर “बिग स्कॅम एक्सपोज” नावाचा एक व्हिडिओ जारी केला होता. ज्यामध्ये त्यांनी बिंद्राच्या कंपनीने फसवणूक केल्याचा दावा केला होता. मात्र, बिंद्राने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

Tags

follow us