Parliament Winter Session : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरली!

Parliament Winter Session : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरली!

Parliament Winter Session : संसदेच्या विशेष अधिवेशनानंतर आता हिवाळी अधिवेशनाचीही तारीख ठरली आहे. येत्या 4 डिसेंबरपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. 4 डिसेंबर ते 22 डिसेंबर दरम्यान हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे. यासंदर्भात संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली आहे.

मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, संसदेच्या अधिवेशनाला ४ डिसेंबरपासून सुरुवात होत असून २२ डिसेंबर चालणार आहे. या १९ दिवसांच्या अधिवेशनात १५ बैठका होणार आहेत, असं जोशी यांनी स्पष्ट केलं आहे.

‘सत्तेसाठी पैसा अन् पैशांसाठी सत्ता..,’; प्रियंका गांधींच्या टोलेबाजीवर बावनकुळेंचं उत्तर

काही दिवसांपूर्वीच संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये महिला आरक्षण विधेयक नारी शक्ती वंदन लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर करण्यात आलं आहे. राज्यसभेत केंद्रीय कायदा मंत्री अर्जून मेघवाल यांनी मांडलं होतं. लोकसभेत हे विधेयक बहुमताने मंजूर झालं आहे, त्यानंतर राज्यसभेतही बिल मंजूर झालं. हे बिल महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्वाचं असल्याचं बोललं जात आहे.

कॅबिनेट बैठकीत एक-दोन मंत्री मार खातील; राऊतांनी सांगितलं मंत्रिमंडळातील इनसाईड गँगवॉर

लोकसभा आणि राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर हे विधेयक राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू यांच्याकडे स्वाक्षरी केली आहे. या विधेयकाचं आता कायद्यामध्ये रुपांतर होणार आहे. त्यामुळे मागील 27 वर्षांपासून सुरु असलेला महिला आरक्षणाचा प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे. हे विधेयक आज जरी मंजूर होणार असलं तरी ते 2029 मध्ये लागू होणार असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान, मागील अधिवेशनात महिला आरक्षण बिलासह इतरही महत्वपूर्ण विधेयक मंजूर करण्यात आली. यादरम्यान, अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आता हिवाळी अधिवेशनातही विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार असल्याचं बोललं जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube