‘सभागृहात त्याला जाम हाणला’, आझमींसोबतच्या वादानंतर भातखळकरांचं ट्विट

‘सभागृहात त्याला जाम हाणला’, आझमींसोबतच्या वादानंतर भातखळकरांचं ट्विट

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात वंदे मातरम म्हणण्यावरुन भाजपचे आमदार अतुल भातखळकर आणि समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यात चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं आहे. दरम्यान, अधिवेशनामध्ये काश्मीरी पंडितांबद्दल बोलताना अबू आझमींनी काश्मीरमध्ये फक्त 89 हिंदु पंडितांची हत्या झाल्याचं म्हटलं होतं. आझमी यांच्या या विधानावरुन अतुल भातखळकरांनी चांगलाच आक्षेप घेत चांगलाच गोंधळ घातला आहे. यासंदर्भातला व्हिडिओ भातखळकरांनी ट्विट करीत ‘सभागृहात त्याला जाम हाणला’ असं कॅप्शनही दिलं आहे.

अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासांमध्ये अबू आझमी यांनी काश्मीरमध्ये झालेल्या हिंदु पंडितांच्या हत्येबद्दल भाष्य केलं. काश्मीरात फक्त 89 हिंदु पंडितांची हत्या झाल्याचं आझमी म्हणाले होते. आझमी यांच्या विधानानंतर भाजपा आमदार आक्रमक झाले. आमदार अतुल भातखळकर आणि अबू आझमी यांच्यात यावरून वाद सुरू झाला. तसेच, अबू आझमी यांच्या वक्तव्यावर शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार प्रदीप जैस्वाल यांनीसुद्धा आक्षेप घेतला होता.

Research Vessel : समुद्रात संशोधन जहाज भरकटलं! कोस्टगार्डने बाजी लावत केली सुटका…

आझमींचं विधान ऐकताच भातकळकरांनी आक्रमक भूमिका घेत म्हणाले, “अबू आझमी फक्त 89 हिंदु पंडितांची हत्या झालीय असं बोलले आहेत, एक व्यक्ती जरी गेली तरी ती तेवढीचं महत्वाची असते, त्याचं हे विधान रेकॉर्डवरुन काढून टाका, फक्त 89 म्हणजे काय? या सभागृहात भाषण करण्याच्या आधी वंदे मातरम् म्हणणार की नाही हे आधी स्पष्ट करा, या शब्दांत भातकळकरांनी आझमी यांना चांगलचं फैलावर घेतलं आहे. “इस देश में रेहना होगा तो वंदे मातरम् कहना होगा” अशा मोठ-मोठ्याने घोषणा देत भातखळकरांनी अबू आझमी यांच्या विधानावर चांगलेच कडाडल्याचे पाहायला मिळाले आहेत.

दरम्यान, ट्विटमध्ये भातखळकर म्हणाले, मावा आघाडीचे (महाविकास आघाडीचे) सरकार असताना अबू आझमी सत्ताधाऱ्यांच्या मांडीवर बसला होता. पण बहुधा सरकार बदलले आहे, याचा त्याला विसर पडला असावा. कश्मीरमध्ये फक्त ८९ पंडीतांची हत्या झाली असे निलाजरे विधान केल्यानंतर सभागृहात त्याला जाम हाणला, असं ते म्हणाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube