मी आणि पीएम मोदींनी एकमेकांचा बांध रेटलाय का?, ‘तो’ प्रश्न विचारताच अजित पवार संतापले

मी आणि पीएम मोदींनी एकमेकांचा बांध रेटलाय का?, ‘तो’ प्रश्न विचारताच अजित पवार संतापले

Ajit Pawar : गेल्या महिन्यात 2 जुलै रोजी अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी (NCP) करत शिंदे-फडणवीस सरकारशी हातमिळवणी केली आणि सत्तेत सहभागी झाले. दरम्यान, या बंडापूर्वी ते विधानसभेतील विरोधी पक्षनेते होते. त्यावेळी ते सातत्याने सत्ताधाऱ्यांवर टीका करत होते. मात्र, आता ही मंडळी एकमेकांची कौतुक करत आहे. आज पुण्यातील कार्यक्रमात बोलतांनी अजित पवारांनी पीएम मोदींचे कौतुकं केलं. त्यावर विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार चांगलेच संतापले. (After praising PM Modi Ajit Pawar got angry when reporters asked questions)

अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेईपर्यंत भाजपवर टीका करत होते. भाजपनेही त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. अजित पवारांच्या बंडखोरीच्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. मात्र आता ही मंडळे एकमेकांचे कौतुक करत आहेत. आज मोदींचं कौतुक करतांना अजित पवारांनी जागतिक स्तरावर मोदींसारखा दुसरा लोकप्रिय नेता कोणी नाही, असं म्हटलं होतं. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी विरोधी पक्षनेते असताना तुम्ही भाजपवर टीका करायचे. आता तुम्ही भाजपचे गुणगान करताय, आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तुमची प्रशंसा केली, तुमची नेमकी भूमिका काय आहे?’ असा सवाल एका पत्रकाराने केला.

पुणे दौऱ्यातील राखीव वेळेत मोदींनी काय केले? 

यावर अजित पवार म्हणाले, आपण दोघांनी (मी आणि नरेंद्र मोदी) एकमेकांचा बांध रेटलाय का? आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गेल्या नऊ वर्षांपासूनचे काम आपण पाहत आहोत. जागतिक स्तरावर त्यांच्यासारखा लोकप्रिय नेता दुसरा नाही आणि हेच सत्य आहे.

भाजपसोबत का गेलात? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, मला विकास हवा आहे. विरोधी पक्षात असताना तुम्ही आंदोलन करू शकता, मोर्चे काढू शकता, मागण्या मांडू शकता. पण निर्णय घेण्याचा अधिकार राज्यकर्त्यांना आहे. मी तिथे सत्तेसाठी नाही तर महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी गेलो होतो. महाराष्ट्रातील विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी मी गेलो होतो. शेतकरी प्रश्न असतील, तरुणांचे प्रश्न असतील, राज्यात उद्योग आले पाहिजेत, अशा अनेक गोष्टींसाठी मी तिथे गेलो.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube