‘आंदोलनासाठी आलेल्या देणग्यांचा हिशोब कुठे?’; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंना थेट सवाल!
Ajay Barskar questions Manoj Jarange; मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर अजय बारस्कर यांनी जोरदार टीका केली आहे.
Ajay Barskar questions Manoj Jarange over donation accounts: मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर अजय बारस्कर यांनी जोरदार टीका केली आहे. “मराठा समाज भावनिक आहे, पण वेडा आणि मूर्ख नाही. गेल्या तीन वर्षांत समाजाच्या पदरात काय पडलं, त्याला काय न्याय मिळाला?” असा सवाल बारस्कर यांनी केला. स्वतःला वाचवण्यासाठी जरांगे समाजाला भावनिक करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मुंबईत बोलताना बारस्कर यांनी जरांगे यांच्या नेतृत्वापासून ते आंदोलनासाठी जमा झालेल्या देणग्या आणि कथित आर्थिक व्यवहारांपर्यंत अनेक मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले.
Rohit Sharma : रोहितच्या कॅप्टसीची घोषणा 5:45 च्या मुहूर्तावर का? खास आहे कारण…
बारस्कर म्हणाले की, मराठा आंदोलनाचा शेवट होत नसला तरी मनोज जरांगे यांचा अस्त होत चालला आहे. एका बाजूला आपल्याकडे काहीच नाही, चपला नाहीत, पैसे नाहीत, अशी वक्तव्यं केली जातात; तर दुसरीकडे त्यांच्या गाड्यांचा ताफा, कपडे आणि राहणीमान समाजासमोर आहे. जरांगे यांच्या निकटवर्तीयांच्या संपत्तीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, काही निकटवर्तीयांनी कोट्यवधी रुपयांच्या जमिनी आणि मालमत्ता खरेदी केल्या आहेत. या व्यवहारांचे पैसे कुठून आले, याचे उत्तर जरांगे यांनी द्यावे, अशी मागणी बारस्कर यांनी केली.
आंदोलनासाठी आलेल्या देणग्यांचा हिशोब कुठे?
मराठा आंदोलनासाठी राज्यभरातून समाजाने अन्नधान्य, तेल, तूप, मसाले, काजू-बदाम यांसह विविध साहित्य पाठवले होते. या वस्तूंचे पुढे काय झाले, असा सवाल बारस्कर यांनी केला. आंदोलनासाठी जमा झालेल्या वर्गणीचा आणि साहित्याचा हिशोब अद्याप का दिला नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. समाजाने दिलेले कूलर, गाद्या, मंडपाचे साहित्य आणि इतर वस्तू कुठे गेल्या, याचा हिशोब द्यावाच लागेल, असे ते म्हणाले.
मोठी बातमी! पवार गटाचा डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा, NDA च्या बाजूने मत देणार!
आरक्षणाच्या मूळ मुद्द्यावर येण्याचे आव्हान
मनोज जरांगे यांनी आंदोलनाच्या मूळ मागण्यांवर बोलावे, असे आव्हान बारस्कर यांनी दिले. मराठा समाजातील गरजवंतांना आरक्षण मिळावे, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा आणि समाजावरील अन्याय दूर व्हावा, या उद्देशाने आंदोलन सुरू झाले होते. मात्र, आता आंदोलनाचा भर कथित क्लिप आणि भावनिक वक्तव्यांवर असल्याची टीका त्यांनी केली.
हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी, सगे-सोयऱ्यांचा प्रश्न, सातारा गॅझेट, मराठा-कुणबी मंत्रालय आणि समाजातील विद्यार्थ्यांना मोठ्या पदांवर पोहोचवण्याच्या आश्वासनांचे काय झाले, असा सवालही बारस्कर यांनी केला.
17 डिसेंबरला वर्षा बंगल्यावर जाण्याचे आव्हान
17 सप्टेंबरला उपोषण सोडताना तीन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. त्यामुळे 17 डिसेंबरला मनोज जरांगे यांनी सर्वांना सोबत घेऊन वर्षा बंगल्यावर जावे आणि मागण्या पूर्ण झाल्याशिवाय परत येऊ नये, असे आव्हान बारस्कर यांनी दिले. हैदराबाद गॅझेट, सगे-सोयरे, मराठा-कुणबी एक असल्याचा जीआर आणि शेतकऱ्यांच्या मदतीच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ठोस भूमिका घ्यावी, असेही ते म्हणाले.
डिलिमिटेशनच्या विधेयकाला ना पाठिंबा, ना विरोध; ठाकरेंच्या शिवसेनेची वेट अँड वॉचची भूमिका!
500 कोटींच्या कथित क्लिपची फॉरेन्सिक तपासणी करा
500 कोटी रुपयांच्या कथित क्लिपवरूनही बारस्कर यांनी जरांगे यांना लक्ष्य केले. ही क्लिप कुठून आली, तिचा स्रोत कोण आहे आणि त्यामागे कोण आहे, हे स्पष्ट करण्याची मागणी त्यांनी केली. क्लिप खरी की खोटी, याची फॉरेन्सिक तपासणी झाली पाहिजे. क्लिप खोटी ठरल्यास मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे बारस्कर म्हणाले.
याशिवाय, विधानसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारांच्या मुलाखती घेणे आणि अर्ज गोळा केल्यानंतर शेवटच्या क्षणी माघार घेण्यामागे काय घडले, असा सवालही त्यांनी केला. कथित आर्थिक व्यवहारांच्या मुद्द्यावरून मुख्य प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप बारस्कर यांनी केला.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही बारस्करांचा सवाल
शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन देण्यात आले होते. जरांगेंकडून 2025 च्या दसरा मेळाव्यात 70 हजार रुपये प्रति हेक्टर, तर 2026 च्या दसरा मेळाव्यात एक लाख रुपये प्रति एकर मदतीची मागणी करण्यात आली होती. दिवाळीनंतर शेतकऱ्यांची बैठक घेण्याचेही सांगण्यात आले होते. मग ही बैठक कधी होणार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जरांगे कधी बोलणार, असा प्रश्न बारस्कर यांनी उपस्थित केला.
अखेर अहिल्यानगर जिल्ह्यात ऊसदराची कोंडी फुटली! 3,450 रुपये दर निश्चित; पहिली उचल 3,250 रुपये
दरम्यान, जरांगे यांच्याविरोधातील प्रकरणांच्या चौकशीसाठी संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या SIT समितीचा अहवाल अद्याप सार्वजनिक का करण्यात आलेला नाही, असा सवालही त्यांनी केला. कुणबी नोंदींसाठी दौरे काढण्यापेक्षा आरक्षणाच्या कायदेशीर प्रक्रियेत नेमक्या कोणत्या अडचणी आहेत, याचा अभ्यास करावा. सरकार किंवा न्यायालयात समाजाच्या आरक्षणासाठी ठोस प्रयत्न केले आहेत का, हेही स्पष्ट करावे, असे बारस्कर म्हणाले.