अजित दादांच्या सोशल ‘कव्हर’वरून राष्ट्रवादी गायब; नाराजीच्या चर्चेला पुन्हा ‘बळ’
गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा चालू आहेत. त्यात आज सकाळपासून अजित पवार ४० आमदार घेऊन बाहेर पडतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या सोशल मीडियाच्या कव्हरवरून कव्हर फोटो डिलीट केल्याची चर्चा आहे.
अजित पवार यांच्या फेसबुक आणि ट्विटरवरील कव्हर फोटो डिलीट केल्याचं दिसत आहे. त्यामुळे अजित पवार यांनी आपल्या सोशल मीडियावरून राष्ट्रवादी हटवल्याची चर्चा रंगली आहे. पण असं असलं तरी त्याच्या ट्विटर बायोमध्ये मात्र अजूनही पक्षाच्या नावाचा उल्लेख आहे. त्यामुळे नक्की काय घडतं आहे, हे सांगणं अवघड झालं आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले…मी काय अजित पवार यांचा प्रवक्ता नाही
दरम्यान आता यावर थेट शरद पवार यांनी उत्तर दिले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर बोलताना शरद पवार म्हणाले की, “ही केवळ तुमच्या (माध्यमांच्या) मनातील चर्चा आहेत. या सर्व बातम्या खोट्या आहेत. अजित पवारही पक्षाचं काम करतायत. राष्ट्रवादीमध्ये सर्व काहीआलबेल आहे. सगळे सहकारी पक्षाला मजबूत करण्यासाठी कार्यरत आहेत.” असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी आज दिलं आहे.
काल अजित पवार यांचा पुरंदरमधील नियोजित दौरा त्यांनी अचानक रद्द केला. त्यामुळे त्यांच्या नियोजित दौरा शरद पवार यांनी पूर्ण केला. त्यामुळे अजित पवार पुन्हा नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यावर आता शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे.
Ajit Pawar : कुठलाही भूकंप सांगून येत नाही, बंडावर अशोक चव्हाणांचं सूचक वक्तव्य
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे राष्ट्रवादीत अस्वस्थ आहे अशा चर्चा समोर आल्या आहेत. यातच भाजपचे नेतेमंडळी देखील कोणी आमच्या सोबत येणार असेल तर त्यांचे स्वागतच आहे, असे म्हणत एक प्रकारे या बातम्यांना हवा देत आहे. यातच अजित पवार आणि या विषयावर कोणतेही भाष्य केले नाही आहे. मात्र सध्या राजकीय वर्तुळात याच चर्चा रंगू लागल्या आहेत.
नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आमदारांनी अजित पवार यांना जाहीरपणे पाठिंबा दिला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभाचे आमदार अण्णा बनसोडे आणि सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे हे आहे. यावेळी बोलताना आमदार बनसोडे म्हणाले, अजित पवार जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य आहे. अजित पवार जिथे जातील तिथे आम्ही जाऊ, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.