मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बदनाम कोण करतंय याची चौकशी झाली पाहिजे – अजित पवार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बदनाम कोण करतंय याची चौकशी झाली पाहिजे – अजित पवार

नागपूर : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून एक शंका येते. देवेंद्र फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्री होते पण यांच्या काळात कधी कोणत्या योजनेला स्थगिती दिली नव्हती. आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर तुम्ही जाणीवपूर्वक हे सर्व घडवून आणायला भाग पाडत आहात असं वाटतंय.

यामध्ये त्यांची बदनामी कशी होईल असं तुम्ही वागताय. लोकांनी असं म्हटलं पाहिजे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी अशा स्थगिती दिल्या नव्हत्या. मात्र एकनाथ शिंदेंनी योजनांना स्थगिती दिल्या.

अशा पध्दतीने एकनाथ शिंदे यांच्यावर स्थगितीचा शिक्का बसावा अशी काही आपल्या मनात भावना आहे का? याची एकदा चौकशी झाली पाहिजे, अशी कोपरखळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लागवला.

सत्ता येत असते सत्ता जात असते. कोणीही ताम्रपट घेऊन जन्माला येत नाही. त्यामुळे जेव्हा सत्ता बदल होते त्यावेळी असं वाटता कामा नये की मागच्या वेळी सरकार मधले लोक असे वागले होते. आता आपणही असंच वागलं पाहिजे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, महाराष्ट्राला हे शोभणारे नाही. आत्तापर्यतच्या मुख्यमंत्र्यांची कारकीर्द पाहिली तर असं कधीही घडत नव्हतं, असे अजित पवार म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube