गट, तट करू नका, चुकीचे वागले तर हयगय केली जाणार नाही; अजितदादांचा सज्जड दम

गट, तट करू नका,  चुकीचे वागले तर हयगय केली जाणार नाही; अजितदादांचा सज्जड दम

Ajit Pawar on Speak Persons and Leaders at Ncp 26th Anniversary Celebration : आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा 26 वा वर्धापन दिन होता. अजित पवार गटाकडून तो पुण्यात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात बोलताना पक्षाचे अध्यक्ष म्हणून अजित पवार (Ajit Pawar ) यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. तसेच यावेळी त्यांनी प्रवक्ते आणि पक्षाचे नेते यांना ठणकावलं आहे. की, गट, तट करू नका, का चुकीचे वागले तर हायगय केली जाणार नाही.

अजितदादांचा सज्जड दम!

यावेळी बोलताना अजित पवार (Ajit Pawar ) म्हणाले की, तुम्हाला कुठे ही असं वावगं काही ऐकायला आलं तर लगेच सांगा. कारण कधी-कधी प्रवक्ते, आमदार हे त्यांना काही माहिती नसताना देखील माध्यमांच्या प्रश्नांची उत्तर देतात. पण त्यांना जर फार महत्त्वाचे प्रश्न विचारले तर सरळ प्रवक्ते आणि आमदार यांनी सांगावं की, यावर वरीष्ठ उत्तरं देतील. प्रत्येकाने बोलण्याची गरज नाही. आम्ही खंबीर आहोत. कारण नसताना वेगळे प्रश्न निर्माण होतील असे वक्तवं करू नका.

Satara Politics : पाटणकरांच्या भाजप प्रवेशावेळी उदयनराजे हजर; शंभुराज यांना सिग्नल दिलाय

संघटनेत काम करणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्याकडे माझं लक्ष आहे. मी इतके दिवस लोकसभा आणि विधानसभेच्या निवणुकीमुळे गप्प बसत होतो. पण आता कार्यकर्त्यांना वेगवेगळी पदं मिळवून द्यायची आहेत. ही पदं देताना एखादा पदाधिकारी जर चुकीचं वागत असेल, तो कुठे कमी पडत असेल तर त्याची हयगय केली जाणार नाही. याचा नोंद घ्या. काही काही हौसे, नवसे, गवसे असे असतात. त्यांनी ही याची नोंद घ्यावी. काम करताना गट तट करू नका. आपल्याला राष्ट्रवादी वाढवायचीय इथं गट तट चालणार नाही.

Video : मी काय माझ्या खिशातले पैसे देतो का?, निधी वळवल्याच्या आरोपांवर अजित पवार…

आपण पक्ष म्हणून एक आहोत. हा आपला परिवार आहे. हे कुणीही विसरता कामा नये. त्यात काही वेगळा विचार करता कामा नये. अशी सुचना मी आपल्या सहकऱ्यांना करतो. आता वेगवेगळ्या भागात दौरे असताना तुम्हाला वेगवेगळे कामं दिले जातील. त्यासाठी सतत संपर्क ठेवत राहा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube