Maharashtra Politics : ‘आमच्याकडे संख्या नाही, संख्या असती तर…? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Politics : ‘आमच्याकडे संख्या नाही, संख्या असती तर…? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

नाशिक : अजित पवार मुख्यमंत्री (Ajit Pawar) व्हावे ही अनेकांची इच्छा असली, तरी आमच्याकडे संख्या नाही, संख्या असती तर आमच्या सहकारी पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला असता, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिले. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्ण विराम मिळाल्याचे स्पष्ट केले आहे.

काही दिवसांपासून अजित पवार हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असल्याचे बोलले जात आहे. आमदार निलेश लंकेंनी (Nilesh Lanke) काल एक असं वक्तव्य देखील केले आहे, की अजितदादांना मुख्यमंत्री करायचंय, यामुळे कामाला लागा. यावर शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून संख्याबळ नसल्याने ते शक्य नसल्याचे त्यांनी थेट सांगितलं. अजित दादा मुख्यमंत्री व्हावे ही अनेकांची इच्छा असली तरी ती आमच्याकडे संख्या नाही, संख्या असती तर आमच्या सहकारी पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला असता, असे शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.

यावेळी शरद पवार म्हणाले की, अनेकांना अजित पवार मुख्यमंत्री पदी आवडतील, मात्र शेवटी संख्या असली पाहिजे, आज आमच्याकडे संख्या नाही, आमच्याकडे संख्या असती तर सगळ्या पक्षांना विचारात घेऊन आम्ही काही निर्णय घेतले असते. आज आमच्याकडे शक्ती नाही, संख्या नाही, यामुळे यावर भाष्य करणे योग्य नाही. त्यामुळे अजित पवार मुख्यमंत्री होणार का ? या प्रश्नाला खुद्द शरद पवार यांनीच पूर्ण विराम दिले.

दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंकेंनी आता पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच आणि तेही अजितदादाच असं जाहीरपणे बोलून दाखवलं होत. अजित पवारांना मुख्यमंत्री करायचंय, त्यासाठी कामाला लागा असं आवाहन काल निलेश लंकेंनी कार्यकर्त्यांना केले होते. विशेष म्हणजे निलेश लंके ज्यावेळी बोलत होते, त्यावेळी अजित पवार देखील उपस्थित होते. त्यांच्यासमोरच अजित पवारांना आपल्याला मुख्यमंत्री करायचंय असं लंके म्हणाले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube