राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘वरिष्ठ उपाध्यक्ष’पदी अनिल भाईदास पाटील अन् लहू कानडे यांची नियुक्ती

Senior Vice President of NCP : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आलीय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) ‘वरिष्ठ उपाध्यक्ष’पदी माजी मंत्री अनिल भाईदास पाटील ( Anil Bhaidas Patil) आणि माजी आमदार लहू कानडे (Lahu Kanade) यांची नियुक्ती करण्यात आलीय. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज नियुक्ती केली आहे.
भारत-पाकिस्तान सान्याबद्दल IIT बाबांचं धक्कादायक भाकित; चाहत्यांमध्ये उसळली संतापाची लाट
दरम्यान अनिल भाईदास पाटील यांच्यावर जळगाव, नंदुरबार आणि धुळे जिल्हा संघटनेच्या प्रभारी पदाची तर लहू कानडे यांच्यावर सामाजिक न्याय विभागाच्या प्रभारी पदाची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी सोपवली आहे.
पक्ष वाढीसाठी आणि पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न (Senior Vice President of NCP) कराल, असा विश्वास व्यक्त करतानाच प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
पनामा अन् कोस्टा रिका! भारतीयांना दुसऱ्या देशांत का धाडतोय अमेरिका? ट्रम्पचा प्लॅन नक्की काय?
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीकडून हे पत्र पाठवण्यात आलंय. त्यावर प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांची सही आणि पक्षाचा शिक्षा आहे. पत्रात म्हटलंय की, मा. अनिल भाईदास पाटील सप्रेम नमस्कार! आपली महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी (Maharashtra Politics) काँग्रेस पार्टीच्या ‘वरिष्ठ उपाध्यक्ष’ पदी नियुक्ती करण्यात येत आहे. आपणावर जळगाव, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांच्या पक्ष संघटनेच्या प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात येत आहे. तरी पक्षाच्या वाढीसाठी आणि पक्षाची सर्व ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी पक्षाला आपले सहकार्य राहील असा मला विश्वास आहे. आपल्या कार्यास शुभेच्छा. आपल्या निवडीबद्दल आपले हार्दिक अभिनंदन, असं या पत्रात म्हटलंय.