‘गोल्डन गँग’ म्हणणाऱ्या सेनेला Ashish Shelar यांचं पलटवार; म्हणाले, “दाऊद गँग केव्हाच उघडी…”
मुंबई : महाराष्ट्रात शिवसेनेशी लढतानाही मोदी एकटे नव्हते, तर सोबतीला राज्यपाल कोश्यारी (Governor Koshyari) यांच्या ‘गोल्डन गँग’चे सदस्य होते. या ‘गोल्डन गँग’च्या सदस्यांना लाभाची पदे आणि आमिषे देऊन लढाईला उतरणे ही काही मर्दुमकी नाही, अशी खोचक टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray group ) मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून पंतप्रधान मोदींवर (Prime Minister Modi) करण्यात आली. याच टीकेला भाजपा नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ट्विट करून पलटवार केलं आहे. आजच्या ‘सामना’च्या अग्रलेखातून बरीच ‘ऍसिडिटी’ फ्लश झाली आहे, असा जोरदार हल्ला देखील केला.
‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आलेल्या टीकेला आशिष शेलार यांनी ट्वीट करत प्रत्युत्तर दिलं आहे. ‘‘तपास यंत्रणा यांना आता विंचू, मगरी सारख्या वाटतात, पण 25 वर्षे मुंबईकरांचे रक्त शोषून भ्रष्टाचार केलात त्याचे काय ? कुठल्या गोल्डन गँग विषयी इशारे करताय ? याकुब,नवाब, हसीना पारकर, सरदार शहावली खान ही तुमची दाऊद गँग केव्हाच उघडी पडलेय. पंतप्रधान बोलले त्याची एवढी सुपारी लागली ?
तपास यंत्रणा यांना आता विंचू, मगरी सारख्या वाटतात, पण 25 वर्षे मुंबईकरांचे रक्त शोषून भ्रष्टाचार केलात त्याचे काय?
कुठल्या गोल्डन गँग विषयी इशारे करताय?
याकुब,नवाब, हसीना पारकर, सरदार शहावली खान ही तुमची दाऊद गँग केव्हाच उघडी पडलेय.
पंतप्रधान बोलले त्याची एवढी सुपारी लागली?
1/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 13, 2023
होय! मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छातीठोकपणे सांगितले, ‘एक अकेला कितनों पर भारी है…!’ हे शब्द काही जणांसाठी “धौतीयोग”सारखे लागलेत. ज्यांना ही “मात्रा” लागू पडली त्यांना मळमळ, जळजळ होणारच ! आजच्या सामनाच्या अग्रलेखातून बरिच “ऍसिडिटी” फ्लश झालेय! होऊ दे एकदम साफ!! अशी खोचक टीका करत पलटवार त्यांनी केलं.
होय! मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छातीठोकपणे सांगितले,
'एक अकेला कितनों पर भारी है…!'
हे शब्द काही जणांसाठी "धौतीयोग"सारखे लागलेत. ज्यांना ही "मात्रा" लागू पडली त्यांना मळमळ, जळजळ होणारच!
आजच्या सामनाच्या अग्रलेखातून बरिच "ऍसिडिटी" फ्लश झालेय!
होऊ दे एकदम साफ!!
2/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 13, 2023
आशिष शेलार नेमकं काय म्हणाले ?
‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आलेल्या टीकेला आशिष शेलार यांनी ट्वीट करत प्रत्युत्तर दिलं आहे. ‘तपास यंत्रणा शिवसेनेला आता विंचू, मगरी सारख्या वाटतात. पण २५ वर्षे मुंबईकरांचे रक्त शोषून भ्रष्टाचार केला त्याचं काय ? शिवसेना नेमकी कोणत्या गोल्डन गँग विषयी इशारे करत आहे ? असा सवाल त्यांनी विचारला आहे. तसेच ‘‘याकूब, नवाब, हसीना पारकर, सरदार शहावली खान ही तुमची दाऊद गँग केव्हाच उघडी पडली, असे देखील त्यांनी यावेळी म्हणाले.