Ashish shelar : मुंबई महापालिकेत ठेकेदारांना पूरक निविदा निघत होत्या

Untitled Design   2023 02 17T195041.717

मुंबई : ‘मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना धन्यवाद देतो. कारण, त्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये कंत्राट दराने ठेकेदारांना पूरक अशा निविदा काढल्या जात होत्या. त्याच परंपरेतील एक निविदा म्हणजे ‘माहीम-बांद्रा सायकल ट्रॅक’ 208 कोटींमध्ये हा ट्रॅक बनवला जात होता. नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या रस्त्यांना लागणाऱ्या निधीपेक्षाही दुप्पट किमतीचा हा सायकल ट्रॅक बनवण्यात येत होता.’

शिवसेना आणि धनुष्यबाण दोन्ही एकनाथ शिंदे गटाचे : भाजपने ठाकरेंना पॉलिटिकली चिरडले

‘मुंबईकरांच्या पैशांची लूट करायची आणि काम देखील ब्लॅक लिस्टमध्ये टाकलेल्या ठेकेदारांना देण्यात आलं. त्यामुळे याला मुंबईतील जनतेचा विरोध आहे. मी या संदर्भात पत्र लिहून देखील महापालिकेकडून ही वर्क ऑर्डर इशू करण्यात आली. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे मी आभार मानतो की, त्यांनी हा प्रकल्प रद्द केला आहे. त्यांच्या निर्णयामुळे आता भ्रष्ट ठेकेदारांना मुंबईमध्ये धारा मिळणार नाही. मुंबईकरांच्या पैशाला योग्य न्याय मिळेल.’

अशी प्रतिक्रिया भाजप आमदार आशिष शेलार यांनी दिली आहे. महाविकास आघाडी सरकार असताना मुंबई महानगर पालिकेमध्ये ‘माहीम-बांद्रा सायकल ट्रॅक’ 208 कोटींमध्ये हा ट्रॅक बनवला जात होता. मात्र आता शिंदे-फडणवीस सरकारने हा प्रकल्प रद्द केला आहे. त्यावर भाजप आमदार आशिष शेलार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले आहेत.

Tags

follow us