वज्रमूठ सभेला अशोक चव्हाणांची दांडी, राजकीय वर्तुळात चर्चा
Ashok Chavan Not Available In Vajramuth Sabha छत्रपती संभाजीनगरमधील सभेला नाना पटोले उपस्थित राहिले नव्हते. ते दुसऱ्या दिवशी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडे दिसून आले होते. आता नागपूर येथे होत असलेल्या सभेला अशोक चव्हाण यांनी दांडी मारली आहे. स्थानिक निवडणुकीचे कारण त्यांनी दिले आहे.
आगोदरच अशोक चव्हाण हे नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा देखील वारंवार होत असतात. त्यात आता नागपूरमध्ये आज महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला अशोक चव्हाण दांडी मारणार असल्यामुळे अजून चर्चेला उधाण आले आहे.
आलिशान लक्झरी गाड्यांची अतिकला होती क्रेझ…
काही दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अचानक दांडी मारली होती. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. आता नागपूरमध्ये होणाऱ्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला काँग्रेसचे जेष्ठनेते अशोक चव्हाण उपस्थिती राहणार नाहीत. काही चर्चा होण्याअगोदरच अशोक चव्हाण यांनी ट्विट करून तशी माहिती देखील दिली आहे.
नांदेड जिल्ह्यातील स्थानिक निवडणुकांची पूर्वतयारी सुरू असल्याने आज नागपूर येथील #महाविकासआघाडी च्या #वज्रमूठ सभेला उपस्थित राहणे शक्य होणार नाही. आघाडीच्या प्रमुख नेत्यांना मी याबाबत पूर्वकल्पना दिली आहे.
सभेला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा.@INCMaharashtra @NCPspeaks @OfficeofUT— Ashok Chavan (@AshokChavanINC) April 16, 2023
प्रकाश आंबेडकरांनी सांगितला योगींचा फंडा, म्हणाले, कायद्याने आळा घालता येत नसेल तर..
अशोक चव्हाण ट्विट करत म्हणतात..नांदेड जिल्ह्यातील स्थानिक निवडणुकांची पूर्व तयारी सुरु असल्यामुळे आज नागपूरमध्ये होणाऱ्या वज्रमूठ सभेला उपस्थितीत राहणं शक्य होणार नाही. आघाडीच्या प्रमुख नेत्यांना मी याबाबतची तशी कल्पना दिली आहे.
रॅपरवर कारवाईवरुन जयंत पाटील आक्रमक… ‘एखादा शब्द अश्लील आहे कि…’
आज नागपूरमध्ये महाविकास आघाडीची दुसरी वज्रमूठ सभा होणार आहे. या सभेसाठी महाविकास आघाडीचील तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर मधील वज्रमूठ सभेला उपस्थित नसलेले काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले देखील उपस्थित राहणार आहे. या सभेमध्ये प्रमुख नेत्यांची भाषणे होणार आहेत. आपल्या भाषणात कोण काय याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.