Ashok Chavhan : ‘लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी फडणवीसांचे वक्तव्य’

  • Written By: Published:
Ashok Chavhan : ‘लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी फडणवीसांचे वक्तव्य’

मुंबई : शरद पवारांशी (Sharad Pawar) चर्चा करूनच आम्ही राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करून सकाळचा शपथविधी केला या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) गौप्यस्फोटाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. यावर ”देवेंद्र फडणवीस सुसंस्कृत, सुज्ञ माणूस आहे, असत्याचा आधार घेवून अशा प्रकारचे स्टेटमेंट ते करतील असे वाटले नाही, अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. तर आता फडणवीसांच्या वक्तव्यावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनीही (Ashok Chavan)  टीका केली. फडणवीसांना निवडणुकीच्या तोंडावरच साक्षात्कार कसा होतो ? असा सवाल अशोक चव्हाणांनी केला.

अशोक चव्हाण म्हणाले की, देवेंद्रजींना हा साक्षात्कार निवडणुकीच्या तोंडावर कसा होतो? हा एक प्रश्न आम्हा सर्वांसमोर आहे. पवार साहेब खूप ज्येष्ठ नेते आहेत, खूप मुरब्बी नेते आहेत, ते असं कधी ही करणार नाहीत, असे चव्हाण म्हणाले.

फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, ‘हे खोटारडे विधान’

अशोक चव्हाण म्हणाले की, शरद पवार यांची आजवरची कारकीर्द राहिलेली आहे. ते जी भूमिका घेतात ती खुलेआम घेतात. लपून छपून राजकारण करण्याचा त्यांचा स्वभाव नाही. फडणवीस यांनी केलेले विधान हे निवडणुकीच्या तोंडावर संभ्रम निर्माण करण्यासारखं आहे. पवार साहेबांसंदर्भात केलेले वक्तव्य चुकीचे आहे, असेही ते म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube