Assembly Election : हम सत्ता में रहना चुनेंगे! सत्तेच्या स्पीचवर प्रकाश आंबेडकरांनीही चेंडू टाकला…

Assembly Election : हम सत्ता में रहना चुनेंगे! सत्तेच्या स्पीचवर प्रकाश आंबेडकरांनीही चेंडू टाकला…

Assembly Election : विधानसभेसाठी मतदानाची (Assembly Election) प्रक्रिया पार पडल्यानंतर आता उद्या 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. मतमोजणी होण्याआधीच रिंगणात उतरलेल्या पक्षांकडून आपापली भूमिका स्पष्ट केली जात आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनीही (Prakash Ambedkar) आपली भूमिका स्पष्ट केली असून यासंदर्भातील पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलीयं. सत्तेत राहणेच आम्ही निवडणार असल्याचे स्पष्ट संकेत प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत.

मागील काही दिवसांपासून राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होती. अखेर मतदानाच्या प्रक्रियेनंतर निकालाची प्रतिक्षा सर्वांनाच लागलीयं. निकालाआधीच महाविकास आघाडी आणि महायुतीकडून पुढची रणनीती आखली जात असतानाच वंचितनेही आपला चेंडू राजकारणात टाकलायं. आंबेडकरांनी खुलेआमपणे आपण सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेणार असल्याचं सांगून टाकलंय. पोस्टमध्ये ते म्हणाले, “उद्या वंचित बहुजन आघाडीने जागा जिंकल्या तर आम्ही महाराष्ट्रात सत्ता स्थापन करत असलेल्या आघाडीला पाठिंबा देऊ. सरकार स्थापन करणाऱ्या आघाडीलाच आमचा पाठिंबा असणार आहे, मग ती कोणतीही आघाडी असो. सत्तेत राहणेच आम्ही निवडणार आहोत” असं आंबेडकरांनी स्पष्ट केलंय.

नाशिक पश्चिममध्ये मतदान यंत्र अन् व्हीव्हीपॅटमध्ये बदल; ठाकरे गटाच्या नेत्याची निवडणूक आयोगात धाव

लोकसभा निवडणुकीला वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत जाणार असल्याची चर्चा होती. यासंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत आंबेडकरांच्या बैठकाही झाल्या होत्या. चर्चेअंती अखेर वंचितने एकला चलो रे चा नारा दिला होता. लोकसभेनंतर विधानसभेला युती होण्याची दाट शक्यता वाटत होती, मात्र महाविकास आघाडी आणि वंचितचे सुत्रे न जुळल्याने लोकसभा आणि विधानसभेला वंचितने स्वबळावरच निवडणूक लढवली.

ब्रेकअपमुळे बलात्काराचा गुन्हा दाखल करता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

दरम्यान, राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान झाल्यानंतर उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये कैद झालंय. मतदानानंतर आता राज्यातील सत्तेची चावी कोणत्या पक्षाच्या हाती जाणार? याचीच उत्सुकता सर्वांना लागलेली आहे. निकालानंतर वंचित बहुजन आघाडीला किती जागा मिळणार? वंचित सत्तेत सहभागी होणार का? या प्रश्नाचं उत्तर आता उद्या निकालानंतरच मिळणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube