बॅग तपासली म्हणून इश्यू करू नका, तो पोलिसांचा अधिकार…; प्रकाश आंबेडकरांचा ठाकरेंवर निशाणा

  • Written By: Published:
बॅग तपासली म्हणून इश्यू करू नका, तो पोलिसांचा अधिकार…; प्रकाश आंबेडकरांचा ठाकरेंवर निशाणा

Prakash Ambedkar : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) प्रचाराचा धुरळा उडला असताना राज्यातील प्रमुख नेते विविध मतदारसंघांत हजेरी लावताहेत. यातच निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने निवडणूक अधिकाऱ्यांकडून (Election Officer) तपासणी केली जात आहे. आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) प्रचारसभेसाठी दाखल झाले असता त्यांच्या  बॅगेची तपासणी करण्यात आली. यावरून आता वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आता वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनीही (Prakash Ambedkar) यावर भाष्य केलं.

Manipur : मणिपूरमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई; चकमकीत 11 संशयित दहशतवाद्यांचा खात्मा 

सगळ्यांच्या बॅगा तपासल्या जातात. माझीही बॅग तपासली जाते. निवडणुकीच्या काळात बॅग तपासणे हा पोलिसांचा अधिकार आहे. त्यात इश्यू करण्याची काही गरज नाही. त्यात काही अर्थ नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

वणी येथील हेलिपॅडवर उतरताच उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांच्या बॅगा तपासण्यात आल्या. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. निवडणुकीच्या काळात बॅग तपासणे हा पोलिसांचा अधिकार आहे. त्यात इश्यू करण्याची काही गरज नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. तर  संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. आतापर्यंत या टीमने किती लोकांच्या बॅंगा तपासल्या. मोदी आणि शहा रोज इथे फिरत आहेत, तुम्ही तपासणी केली का? मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि अन्य मंत्र्यांच्या तपासण्या होत नाहीत. त्यांच्या हेलिकॉप्टर आणि वाहनातून पोलिस बंदोबस्तात पैशांचे वाटप सुरू आहे, असा आरोप राऊत यांनी केला.

कार्यकर्ता भाजपाची खरी शक्ती, राज्यात पुन्हा महायुती सरकार, मंत्री रवींद्र चव्हाणांना विश्वास 

आदित्य ठाकरे काय म्हणाले?
दरम्यान, जे कायद्याला धरून ते झालेच पाहिजे! पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीयांना संविधानातून जो समानतेचा हक्क भारतीयांना दिला, तो सगळ्यांना लागू व्हायला हवा, कायदा सर्वांसाठी समान असावा! महाराष्ट्रात येणाऱ्या दिल्लीश्वरांची आणि राज्याला लुटणाऱ्यांची तपासणी व्हायला हवी! होऊन जाऊ दे, दूध का दूध और पानी का पानी, अशी संतप्त प्रतिक्रया आदित्य ठाकरेंनी दिली.

तर उद्धव ठाकरे साहेबांच्या बॅगा चेक करून प्रशासनाच्या हाती निराशा लागली असली तरी प्रशासननाने महायुतीच्या नेत्यांचे तसेच गुजरात आणि दिल्लीहून येणाऱ्या हेलिकॉप्टर आणि विमानांचीही प्रशासनाने तपासणी केल्यास प्रशासनाची निराशा होणार नाही, हे निश्चित, असा टोला रोहित पवारांनी लगावला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube