सट्टाबाजारात फडणवीस फेव्हरेट! महायुतीला 1 रूपयाला 45 पैसे भाव, मविआला किती भाव?
Mahayuti Favorite In Betting Markets : राज्यात विधानसभा निवडणूक (Assembly Election 2024) संपली असून उद्या निकाल जाहीर होणार आहेत. यंदाची निवडणूक अनेक कारणांमुळे चांगलीच चर्चेत आहे. सट्टेबाजारात देखील या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. सटोडीयांचे लक्ष सट्टा बाजाराकडे लागलं होतं. गुरूवारी दोन तासांसाठी सट्टाबाजार उघडला गेला होता. यामध्ये सटोडीयांनी मात्र महायुतीला (Mahayuti) फेव्हरेट दाखवलं आहे. महायुतीला 145 ते 153 जागा मिळणार असून महायुतीचंच सरकार स्थापन होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
राज्यात क्रिकेटप्रमाणे निवडणुकीवर देखील मोठ्या प्रमाणात (Assembly Election 2024 Result) सट्टा लावला जातो. या सट्टेबाजारात पहिल्या क्रमांकावर देवेंद्र फडणवीस, दुसऱ्या क्रमांकावर एकनाथ शिंदे यांना पसंती देण्यात आली आहे. आज रात्री सट्टबाजार उघडल्यानंतर पुन्हा सटोडियांची भाव आणि पसंती समोर येणार आहे. राज्यात सरकार स्थापन करण्यापैकी 288 आमदारांची गरज आहे. बुधवारी मतदान पार पडलं. त्यानंतर मुंबई आणि दिल्लीतील लाईन चालवणाऱ्या शहरातील बुकींनी काही तास मार्केट सुरू केलं होतं. सर्वसामान्य माणूस ते उद्योग क्षेत्र अशा सर्वांनाच निकालाची अपेक्षा आहे.
बहुमत न मिळाल्यास भाजप सरकार कसं स्थापन करणार? महायुतीचा ‘प्लॅन बी’ तयार
गुरुवारी सायंकाळी दोन तास सट्टाबाजार उघडण्यात आला होता. यावेळी महायुती अन् महाविकास आघाडीला किती जागा मिळणार, या मुद्द्यावर भाव दिला गेला होता. यावेळी मात्र 145 ते 153 जागांवर महायुती निवडून येण्याची शक्यता वर्तवली. तर महायुतीला 1 रूपयाला 45 पैसे भाव देण्यात आला. तर महाविकास आघाडीला मात्र 1 रूपयाला 2 रूपये 15 पैसे असा भाव देण्यात आला. या बाजारात ज्याचा भाव कमी असतो, त्याची निवडून येण्याची शक्यता जास्त असते. यामुळे महायुतीला फेव्हरेट मानलं जातंय.
बहुमत न मिळाल्यास भाजप सरकार कसं स्थापन करणार? महायुतीचा ‘प्लॅन बी’ तयार
आज रात्री स्थानिक पातळीवरील मार्केटदेखील ओपन होणार आहे. यामुळे सटोडीयांना स्थानिक उमेदवारांचे भाव समजण्यास मदत होईल, अशी माहिती मिळतेय. सट्टबाजारातील गणितानुसार भाजपला 85 ते 90 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर ठाकरे गटाला 35 ते 40 जागा, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 25 ते 33 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली गेलीय. यात भाजपला 1 रुपयाला 40 पैसे भाव, काँग्रेसला 50 पैसे आणि शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट अशा दोघांना 45 पैसे भाव देण्यात आलाय.
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना सट्टेबाजारात 1 रुपयाला 60 पैसे इतका भाव देण्यात आलाय. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये मात्र सट्टेबाजारात देवेंद्र फडणवीस यांचं पारडं जड दिसलंय. फडणवीस यांना 1 रुपयाला 30 ते 35 पैसे भाव देण्यात आलाय. एकनाथ शिंदे यांना 55 पैसे आणि उद्धव ठाकरे यांना 55 ते 60 पैसे इतका भाव देण्यात आलाय.