देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री म्हणून नापास; कॉंग्रेसची सडेतोड टीका

देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री म्हणून नापास; कॉंग्रेसची सडेतोड टीका

Atul Londhe On Devendra Fadnavis : बंदुकीच्या धाकावर एका व्यावसायिकाचे अपहरण केल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गोरेगाव येथील वनराई पोलीस ठाण्यात राज सुर्वे याच्यासह 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुर्वे यांच्यासह 12 जणांनी व्यावसायिकाच्या कार्यालयात घुसून मारहाण केल्याचा आरोप आहे. दरम्यान, यावरून आता कॉंग्रसच प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी गृहमंत्रालयाच्या कारभारावर ताशेरे ओढले. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे गृहमंत्री म्हणून नापास आहेत, अशी टीका त्यांनी केली. (Atul Londhe On Devendra Fadnavis over praksh surve son raj surve and law and order in state)

अतुल लोंढे याबाबत बोलतांना म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी हेच का लोकाचं सरकार ? आपण सांगता, हे लोकाचं, सर्वसामान्य माणसाचं सरकार आहे. मात्र, सामान्य माणूस, व्यापारी तुमच्या आमदारांकडून, त्यांच्या पोरांकडून आणि त्यांच्या गुंडाकडून मार खाण्यासाठी आहेत का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री फडणवीस हे काय करत आहेत? आमदार प्रकाश सुर्वेचा मुलगा हा एका कंपनीच्या सीईओला किडनॅप करतो. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. मात्र, सरकार अटक का करत नाही? आमदार सुर्वेंचा मुलगा कुठं पळून गेला का? असा थेट सवालही त्यांनी केला.

घरा बाहेर गारा पडत होत्या म्हणून… ‘जवान’ साठी केलेल्या टक्कलवर शाहरूखचं मजेशीर उत्तर 

आमदार किशोर पाटील यांच्याविरोधात लिहिलं म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी पत्रकाराला लाथा बुक्क्यांनी मारलं. कुठं गेलं हे सरकार? कायदा आणि सुव्यवस्थेची अवस्था काय करून ठेवली. गृहमत्री म्हणून देवेंद्र फडणवीस नापास आहेत. तुमच्या काळात वाढत चाललेला अन्याय अत्याचार पाहता आगामी निवडणुकीत जनता तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा लोंढे यांनी दिला.

गेल्या काही काळापासून राज्यातील कायदा व सुव्यवस्था कोलमडली आहे. खून, धार्मिक दंगली, राजकीय नेत्यांना धमक्या, जातीय तणावाच्या अनेक घटना घडत आहेत. त्यामुळे गृहमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली गेली. फडणवीस यांना जमत नसेल तर त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube