आमदार पाचपुते अपघातग्रस्त महिलेच्या मदतीला, चौंडीला जाताना घडली घटना

आमदार पाचपुते अपघातग्रस्त महिलेच्या मदतीला, चौंडीला जाताना घडली घटना

Babanrao Pachpute Saved Women in Accident : आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज 298 वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावामध्ये त्यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी भाजपचे आमदार राम शिंदे यांनी सपत्नीक चौंडीतील महादेव मंदिरामध्ये अभिषेक केला.

Gautami Patil : राजकारणातल्या दोन पाटलांच्या वादात गौतमीची उडी, म्हणाली माझ्यावर…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याची पहाटेपासूनच लगबग सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या उपस्थितीत हा शासकीय जयंती सोहळा पार पडत आहे.

मावळसाठी राष्ट्रवादीचा प्लॅन ‘B’ : पार्थ पवार नसतील तर ‘या’ बड्या नेत्याची मुलगी रिंगणात!

दरम्यान या कार्यक्रमाला श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव पाचपुते हे काष्टी येथून चौंडी या ठिकाणी जात असताना लिंपणगाव गेटवर गतिरोधकावर ती एका टू व्हीलरवरून महिला पडून तिचा अपघात झाला. अपघाता दरम्यान आमदार पाचपुते साहेबांनी त्यांचे पीए वाहनचालक व अंगरक्षक यांना सूचना करून ॲम्बुलन्स बोलवण्याची व्यवस्था केली.

Abortion : 26 आठवड्यांचा गर्भपातास परवानगी, मुंबई उच्च न्यायालायाचा महत्त्वाचा निर्णय

स्वतः आमदार बबनराव पाचपुतेंनी या परिस्थितीत लक्ष घालून या अपघातग्रस्त व्यक्तींना हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याची व्यवस्था केली पुढे न जाता स्वतः आमदार साहेब तिथे थांबून त्याना हॉस्पिटलमध्ये नेण्याची व्यवस्था केली व ॲम्बुलन्स मध्ये पाठवल्यानंतर डॉक्टरांना योग्य त्या सूचना फोनवरून देण्यात आल्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube