अमित शाहांनी राहुल गांधींपेक्षा जास्त मूर्खपणा केला; बच्चू कडूंनी सुनावलं

अमित शाहांनी राहुल गांधींपेक्षा जास्त मूर्खपणा केला; बच्चू कडूंनी सुनावलं

Bachchu Kadu on Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी बुधवारी राहुल गांधींवर टीका करतांना म्हटले की, कॉंग्रेसने कलावती बांदूरकर (Kalavati Bandurkar) यांना वाऱ्यावर सोडून दिलं. राहुल गांधी यांनी कलावती यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांच्या गरीबीची हृदयद्रावक कहाणी संसदेत सांगितली. मात्र त्यानंतर त्यांनी कलावती यांना मदत केली नाही. तर त्यांच्या वेदनांचे राजकारण केले. मात्र, मोदी सरकारने त्यांना वीज, घर अशा सर्व सुविधा दिल्या. यानंतर कलावती यांनी अमित शाह यांचा दावा फेटाळून लावत आपल्याला राहुल गांधींमुळे सर्व मदत मिळाल्याच सांगिलतं. यासगळ्या प्रकारवरून आता प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी आपली प्रतिक्रिया दिली. अमित शाह यांनी राहुल गांधी यांच्यापेक्षा जास्त मूर्खपणा केल्याचं ते म्हणाले. (Bachchu Kadu on Amit Shah over Kalavati Bandurkar)

आज एका वृत्तवाहिनीशी बोलतांना बच्चू कडू म्हणाले, पहिल्यांदा राहुल गांधींनी मूर्खपणा केला. कलावती यांना घर बांधून देणं ही विटंबना होती. सर्वसामान्य लोकांचा छळ करण्यासारखे हे होतं. तुम्ही सरकारमध्ये असताना धोरण ठरवायला हवे होते. नुसतं कलावती यांच्या घरी जाऊन वीज, घर द्यायचं हे तर डिचण्यासारखी पद्धत आहे. कोट्यवधी लोक रांगेत उभे असताना एकावर उदार होऊन बाकीच्यांना भोपळा द्यायचा, अशी संतप्त प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी व्यक्त केली.

IND vs WI: चौथ्या T20 सामन्यात होऊ शकतात मोठे बदल, अशी असेल प्लेइंग इलेव्हन 

आता अमित शहांनी संसदेत राहुल यांच्यापेक्षा मोठा मूर्खपणा केला आहे. कलावती यांना वीज आणि घर दिले, असे अमित शहा संसदेत म्हणाले. पण, कलावती यांनी ‘जे काही दिले ते काँग्रेसने दिले’ असे म्हटले आहे. एवढ्या मोठ्या नेत्यांनी खोटं बोलतांना थोडा विचार करण्याची गरज होती. त्यामुळे भाजप पक्षाच्या अडचणीत वाढ होते. प्रत्येक गोष्टीत हे खोटं बोलतात,असा प्रचार झाला आहे. आता अमित शाहा यांनी विरोधकांना नवी संधी दिली आहे, असे बच्चू कडू म्हणाले.

घरकुलाचा प्रश्न दोन्ही राजवटीत सोडवल्या गेला नाही. आम्ही त्याच्यासाठी भांडतोय. देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली तरीही घराचा प्रश्न तसाच आहे. यावर कोणीच बोलत नाही, याची खंत असल्याचं कडू यांनी सांगितलं.

मंत्रिमंडळ विस्तारावर प्रश्न विचारताच ते म्हणाले, आम्हाला विस्ताराचं काही करायचं नाही. मंत्रिमंडळ विस्तार जेव्हा व्हायचा तेव्हा होऊ द्या, असं ते म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube