Balasaheb Thackeray Jayanti : खास ट्विट करत पंतप्रधान मोदींचं बाळासाहेबांना अभिवादन

Untitled Design (53)

नवी दिल्ली : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray) यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने सर्वच राजकीय नेते आठवणी सांगून बाळासाहेबांना आदरांजली अर्पण करत आहेत. याच निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले आहे. पंतप्रधान मोदींनी बाळासाहेबांना अभिवादन करणारे एक ट्विट केले आहे.

बाळासाहेबांना अभिवादन करणाऱ्या या ट्विटमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत की, ‘बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. अनेकदा त्यांच्याशी झालेले संवाद मी माझ्या ह्रदयात जपून ठेवेल. त्यांना समृद्ध ज्ञान आणि बुद्धी लाभली होती. त्यांनी आपले जीवन लोककल्याणासाठी वाहून घेतले.’ अशा शब्दांत त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सह देशातील अनेक दिग्गजांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले आहे. यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट केले आहे.

‘स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या लेखणीत व कुंचल्यात सामाजिक व राजकीय परिस्थितीवर मार्मिक भाष्य करण्याचे सामर्थ्य होते. आपल्या अमोघ वकृत्वाद्वारे मराठी माणसांच्या मनात स्वाभिमान जागृत करणारे शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!’ अशा शब्दांत शरद पवारांनी बाळासाहेबांना अभिवादन केले आहे.

Tags

follow us