अजित पवार सत्तेत; गोगावले म्हणाले, ‘नाराज होऊन काय करता? मंत्रिमंडळ विस्तारात माझा नंबर…’
Bharat Gogavale : राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी (Ajit Pawar) थेट शरद पवारांविरोधात (Sharad Pawar)बंडखोरी करून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळं डबल इंजिन सरकारला आणखी एकाची साथ मिळाली. भुजबळ यांच्यासह राष्ट्र्दीच्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. हा शपथविधी झाल्यावर आता आणखी हालचाली वाढल्या आहेत. शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे समजते. अशातच राष्ट्रवादीच्या वाट्याला येणाऱ्या खात्यांची संभाव्य यादी समोर आली असू्न यात अजित पवारांकडे अर्थ व वित्त खातं असण्याची शक्यता आहे. त्यामुळं शिंदे गटाची मोठी गोची होणार आहे. दरम्यान, यावर आता शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogavale) यांनी भाष्य केलं. (Bharat Gogavale on Ajit pawar and cabinet expansion)
राष्ट्रवादीच्या येण्यानं शिंदे गट नाराज का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच गोगावले म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जे काही ऑपरेशन करत होते, ते ऑपरेशन त्यांनी यशस्वी केलं. आता नाराज होऊन काय करता? वस्तुस्थिती स्वीकारावी लागेल. थोडीफार नाराजी राहणार आहे. ज्यांना एक भाकरी खायची होती, त्यांना अर्धी भाकरी मिळाली. ज्यांना अर्धी भाकरी खायची होती, त्यांनी पाव भाकरी मिळाली. सगळं समीकरण घेऊन पुढे चालायचं असेल तर हे समीकरणं स्वीकारायला पाहीजे, असं गोगावले म्हणाले.
‘आमच्या भाकऱ्या तव्यावर तशाच पण, अजितदादांनी’.. शिंदे गटाच्या मंत्र्याची सावध प्रतिक्रिया
महाविकास आघाडीचं सरकार असताना अजित पवारांनी विकासनिधी न दिल्याने शिंदे गटाने बंड केले, त्यामुळं मविआ सरकार पडलं होतं. दरम्यान, आता अजित पवार बंड करून सत्तेमध्ये सामील झाले. त्यामुळं शिंदे गटाला अजित पवारांसोबत काम करावे लागणार आहे, आताही निधी मिळाला नाही तर काय करणरा असा सवाल पत्रकारांनी केला. यावर भरत गोगवाले म्हणाले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी देश आणि राज्याच्या हितासाठी जे निर्णय घेतले ते मान्य करणं क्रमप्राप्त आहे. त्यांना कोणते खाते द्यायचे हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील. अर्थ खाते अजित पवारांना जरी मिळालं तरी महाविकास आघाडीत असतांना जे काही शिवेसेनसोबत घडलं, तसं होऊ होणार नाही. अजित पवारांना न्याय द्यावाचा लागेल, असं गोगावले म्हणाले.
राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार अजूनही रखडला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अशा स्थितीत पुढील मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातील किती आमदारांना मंत्रिपद मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. यावर भरत गोगवाले म्हणाले की, या मंत्रिमंडळ विस्तारात मी नक्कीच मंत्री होणार आहे. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात आम्ही पहिल्या नऊ मंत्र्यांमध्ये होतो. पण, काही कारणास्तव आम्ही थांबलो. सबुरी का फल मिठा होता है, पण आता थांबायची वेळ नाही. आता आमचा नंबर मंत्रिमंडळ विस्तारात लागेल, काळजी करायची गरज नाही, असं ते म्हणाले.