‘भाजपचा पहिला फेकू कोण?’; संदीप देशपांडेंचा भाजपवर थेट निशाणा

Sandeep Deshpande targets BJP मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ‘भाजपचा पहिला फेकू कोण?’ असा सवाल करत भाजपवर निशाणा साधला.

Sandeep Deshpande targets BJP

Sandeep Deshpande targets BJP: पुण्यातील एका महाविद्यालयाच्या दौऱ्यादरम्यान अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढायला लावल्याच्या प्रकरणावरून भाजप आणि मनसेमधील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाने मंगळवारी (1 सप्टेंबर) मुंबईत मनसेविरोधात आंदोलन केले. याच पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मनसेला मिळाली.

मराठा आरक्षणाच्या मसुद्यावर सरकार सकारात्मक; ‘त्रुटी असतील तर सांगा, दुरुस्त करू,- विखे पाटील

भाजप कार्यकर्ते शिवतीर्थकडे येणार असल्याचे समजताच मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर जमा झाले. त्यामुळे शिवाजी पार्क परिसरात दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी दादर, माहीम आणि माटुंगा परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला.

भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना शिवाजी पार्कमध्ये प्रवेश नाही

भाजप युवा मोर्चाचे कृष्णराज महाडिक कार्यकर्त्यांसह माहीम आणि माटुंगा परिसरातून शिवतीर्थच्या दिशेने जाणार होते. मात्र, मनसे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आणि संभाव्य संघर्ष लक्षात घेऊन पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यापासून रोखले.

ठाकरेंचा युक्तिवाद संपला; आजपासून शिंदे गटाची ‘बॅटिंग’, शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुनावणी

कृष्णराज महाडिक यांनी पोलिसांची नजर चुकवून माहीममधून शिवतीर्थच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. अमित ठाकरे यांच्या कृतीचा निषेध करण्यासाठी आपण आंदोलन करत असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांचे फोटो प्रोटोकॉलनुसार महाविद्यालयात लावणे आवश्यक असल्याचा दावा त्यांनी केला.

दरम्यान, भाजयुमोचे कार्यकर्ते माहीम आणि माटुंगा परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनीही या भागात धाव घेतली. दोन्ही गट आमनेसामने येण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करत अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मनसेचे गजानन काळे यांच्यासह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

संदीप देशपांडेंचा सोशल मीडियावरून भाजपला टोला

या सर्व राजकीय घडामोडी सुरू असतानाच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपवर निशाणा साधला. या पोस्टमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं थेट नाव घेतलेलं नाही. मात्र, मोदींच्या जुन्या विधानांचा संदर्भ देत त्यांनी भाजपवर उपरोधिक टीका केली.

हा विषय तुमचा नाही! चर्चेला आलेल्या जिल्हाधिकारी अन् पोलीस अधीक्षकांचा प्रस्ताव जरांगे पाटलांनी फेटाळला

भाजपचा पहिला “फेकू ” कोण ?

संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावरती पोस्ट करत म्हटलं की, “गटारातून गॅस तयार करणारा, ढग असतील तर रडार काम करत नाही हे ज्ञान देणारा, 15लाख तुमच्या खात्यात जमा करतो हे फेकणारा भाजपचा पहिला “फेकू ” कोण ?”

या पोस्टनंतर आता भाजपकडून यावर काय प्रतिक्रिया दिली जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

शिवतीर्थाबाहेर मनसेची मोठी गर्दी

दरम्यान, मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर उपस्थित होते. भाजप युवा मोर्चाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवतीर्थ परिसरात मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या सुधारित खर्चाला राज्य सरकारची मंजुरी

पोलिसांनी खबरदारी म्हणून दोन्ही गटांना एकमेकांसमोर येऊ न देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे संभाव्य संघर्ष टळला असला तरी अमित ठाकरे यांच्या महाविद्यालयातील कृतीवरून भाजप आणि मनसेमधील राजकीय वाद आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

follow us