उद्धव ठाकरेंमुळे नाणार प्रकल्प पाकिस्तानात? शेलारांचा गंभीर आरोप

उद्धव ठाकरेंमुळे नाणार प्रकल्प पाकिस्तानात? शेलारांचा गंभीर आरोप

Aashish Shelar On Udhdhav Thackeray : भाजपनचे नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर मोठा आरोप केला आहे. नाणारचा होऊ घातलेला प्रकल्प हा उद्धव ठाकरेंमुळे पाकिस्तानला गेला, असा आरोप शेलारांनी केला आहे. शेलारांच्या या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे. नाणार प्रकल्प पाकिस्तानला जात आहे. उद्धव ठाकरे यांनी सातत्याने विरोध केल्यामुळे महाराष्ट्र आणि देशाचं कोट्यवधीचं नुकसान झालं आहे. उद्धव ठाकरे यांनी नाणारला विरोध करून एकप्रकारे पाकिस्तानलाच मदत केली आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

शेलार म्हणाले की, “कोकणातील नाणार येथे होणारा देशातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प आपल्याला मिळावा म्हणून पाकिस्तान प्रयत्न करीत आहे. या प्रकल्पात सर्वात मोठी गुंतवणूक असलेल्या सौदी अराम्कोने या तेल कंपनीने आता पाकिस्तानातील ग्वादर शहराची निवड केली आहे. १० अब्ज डॉलर्स गुंतवणुकीच्या सामंजस्य करारावर पाकिस्तान व सौदी अरेबियाने स्वाक्षरी केल्याची बातमी नवशक्ति या वर्तमानपत्रात आली आहे.”

‘जायचं तर जा पण, पक्षाशी गद्दारी करू नका अन्यथा’.. उद्धव ठाकरेंचा फुटीरांना रोखठोक इशारा

ते पुढे म्हणाले की, गेली सहा वर्षे नाणार येथे रिफायनरीला विरोध करणाऱ्या उबाठाने कोकण, महाराष्ट्र आणि देशाचे कोट्यावधीचे नुकसान केले? प्रकल्प भारताला मिळू नये म्हणून ज्या आंतरराष्ट्रीय शक्ती काम करतात त्या नाणार विरोधी आंदोलनात सहभागी तर नव्हत्या? देश विरोधी आंतरराष्ट्रीय शक्तींशी प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांची हातमिळवणी तर नव्हती? उबाठाने नाणारला विरोध करुन सरळ सरळ पाकिस्तानला मदत केली?

भिडे या भयानक विकृत वृत्तीच्या माणसाला तात्काळ अटक करावी; कवी सौमित्र यांची मागणी

दरम्यान, शेलारांच्या या ट्विटमुळे एकच खळबळ उडाली आहे. हा रिफायनरी प्रकल्प आधी नाणार येथे होणार होता. आता बारसू येथे होत आहे. काही दिवसांपूर्वी बारसू येथील नागरिकांनी रिफायनरी विरोधात जोरदार आंदोलन केले होते. पण आता शेलारांच्या आरोपांमुळे हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता तयार झाली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube