डावखरे कुटुंबात फूट, निरंजन डावखरेंच्या मोठ्या भावाचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश…
भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांचे बंधू प्रबोध डावखरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने डावखरे कुटुंबात फूट पडल्याचं बोललं जातंय.
Prabhodh Davkhare : ज्येष्ठ नेते वसंत डावखरे यांचे चिरंजीव आणि भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांचे मोठे बंधू प्रबोध डावखरे (Prabhodh Davkhare ) यांनी मोठा निर्णय घेतलायं. मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात प्रबोध डावखरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. प्रबोध डावखरे यांच्या पक्षप्रवेशामुळे डावखरे कुटुंबात राजकीय फूट पडल्याचं बोललं जात आहे.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रबोध डावखरे यांचं राष्ट्रवादीत स्वागत केलं आहे. या पक्षप्रवेशावेळी मंत्री भुजबळ म्हणाले, वसंत डावखरे अजात शत्रू होते, पण कुठेही शत्रुत्वाची भावना मनात नव्हती. चिरंजीव प्रबोध डावखरे हे उत्तम व्यवसायिक असून त्यांना पक्षात चांगली वागणूक मिळेल, काहीही कमी जास्त असं होणार नसल्याचं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलंय.
Pruthviraj Mohol : महेंद्रला माझा हात उखडायचाच होता…जखमी पृथ्वीराज मोहोळचे गंभीर आरोप
वडिलांचा वारसा पुढे नेईल…
माझ्या वडिलांनी आयुष्भर ज्या पक्षासाठई कष्ट केले त्या पक्षात मी आज प्रवेश करत आहे. माझ्यासाठी हा महत्वाचा दिवस आहे. माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं, ज्यावेळी तुला वाटेल राजकारणात जायचं तेव्हा राष्ट्रवादीत जा. त्यानुसार मीआज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचं प्रबोध डावखरे यांनी स्पष्ट केलंय.
राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत आधी बैठक केली. त्यानंतर मी सर्वच नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे, त्याबद्दल मी आभारी. संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाच काम कसं पोहोचवता येईल यासाठी प्रवेश केला आहे. सोबत नव्या पिढीला मी घेऊनच काम करणार असल्याचं प्रबोध डावखरे यांनी स्पष्ट केलंय. ठाणे जिल्ह्यात मी विकासासाठी काम करणार असून पक्षासाठीच काम करणार असल्याचं डावखरे यांनी सांगितलंय.