उद्धव ठाकरेंना हिXXX प्रमुख म्हणायचं का? राणेंची जहरी टीका

  • Written By: Published:
Letsupp Image (46)

Nitesh Rane On Sanjay Raut :  भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत व उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. त्यांनी उद्धव ठाकरेंचे थेट अरे- तुरे असा उल्लेख केला आहे. यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेत ठाकरे गटाला 22 जागा मिळणार असा महाविकास आघाडीचा सर्वे आल्याचा दावा देखील केला आहे. तसेच संजय राऊत यांच्यावर देखील तोंडसूख घेतले.

राज्य सरकारकडून 50 लाखांचा जाहिरातीचा बिझनेस सामना घेत आहे.   मुंबई महापालिकेकडून आजही सर्वात जास्त सामनाला  जाहिरातीतून निधी दिला जातोय. त्यामुळे हे कोणत्या आधारावर रेल्वेमंत्र्यांच्या  राजीनाम्याची मागणी करत आहे. त्यांनी रेल्वे स्पॉट क्लीन होईपर्यंत ठिकाण सोडलं नाही. त्यामुळे हे कोणत्या आधारावर नैतिकतेच्या गोष्टी करत आहे, असे म्हणत त्यांनी राऊतांना सुनावले.

Video : गुजरात दंगल : मोदी टार्गेटवर कसे आले?

तुझा मालक जो आज लंडनला गेलाय, त्याचा खर्च हा कोविडच्या काळात कमावलेल्या पैशातून झालाय. तुझ्या मालकाने विधानपरिषदेचा आमदारकीचा राजीनामा देतो सांगून दिला का. हे म्हणतात खरी शिवसेना दिल्लीला जात नाही. पण तुझा मालक मुख्यमंत्री असताना दिल्लीला 10 जनपथवर कितीवेळा गेला तमाशे करायला. आम्हाला हेच कळत नव्हत की दिल्लाीला राहुलंच ममी आहे की मातोश्रीची मम्मी आहे. उद्धव ठाकरे जनपथवर उद्धव ठाकरे साडी घालून जायचा का? हिजड्यांचं प्रमुख यांना म्हणायचं का? , असं राणे म्हणाले आहेत.

Video : गुजरात दंगल : मोदी टार्गेटवर कसे आले?

उगाच आमच्यावर आरोप करण्यापेक्षा तुझ्या मालकाने अडीच वर्षात काय केले याची माहिती देखील विचार. आम्ही ऐकलंय याने अजितदादांवर बोलल्यामुळे कानात रक्त येईपर्यंत शरद पवारांनी  लायकी काढली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तुझी काय लायकी आहे ते कळाले आहे. महाविकास आघाडीचा एक इंटरनेल सर्वे आला आहे. यात ठाकरे गटाला  मुंबई महापालिकेत फक्त 22 जागा दाखवल्या आहे. त्यामुळे ठाकरे गट आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार अशा बातम्या समोर येत आहे, असे म्हणत त्यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला.

Tags

follow us