शिरुरसाठी भाजप आणि राष्ट्रवादीमध्येच रस्सीखेच! कोल्हेंच्या विरोधात लढण्यासाठी ‘या’ भाजप आमदाराने थोपटले दंड
Shirur Lok Sabha : आगामी लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) जसजशा जवळ येत आहेत, तसतशा सर्वच पक्षांत चुरस पाहाययला मिळत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दावा केला होता. त्यांनी खासदार अमोल कोल्हे यांना पराभूत करण्याचं आव्हान दिलं. अशातच आता भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे (MLA Mahesh Landge) यांनी शिरूर लोकसभा (Shirur Lok Sabha) लढवण्याची इच्छा व्यक्त केली.
विधानसभेचे अध्यक्षपद किती महत्वाचे असते? नाना पटोले अन् काँग्रेसला ‘हिमाचल प्रदेश’ने दिले उत्तर
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे हे शिरूर लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. त्यांनी मागील लोकसभेला आढळराव पाटील यांच्याविरोधात विजय मिळवला होता. आता पुन्हा एकदा या मतदारसंघातून कोल्हेंनाच तिकीट दिले जाण्याची शक्यता आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातून कोल्हे यांच्याविरोधात कोण लढणार? अशी चर्चा रंगत असतांना आता भाजप आमदार महेश लांडगे यांनी भाजपकडून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. बुथ कमिटी संमेलनाच्या सभेत त्यांनी तसे संकेत दिले. केंद्रातील सत्तेतची आणि नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या हॅट्रिकसाठी आपल्याला शिरूर लोकसभा जिंकण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
DRDO मध्ये नोकरीची संधी, ९० जागांसाठी भरती सुरू, कोण करू शकतं अर्ज?
लांडगे म्हणाले, शिरूरचा खासदार भाजपचा हवा हे माझं मत आहे. पण माझ्या दृष्टीने हा देश परत सुरक्षित राहण्यासाठी मोंदीकडे गेला पाहिजे. त्यासाठी राज्यातला जास्तीत जास्त लोकसभा मतदारसंघ जिंकले पाहिजेत. राज्यातल्या 48 लोकसभेत शिरुर हा 36 नंबरचा मतदारसंघ आहे. ३६ हा आकडा माझ्यासाठी लकी आहे. 36 नंबरच्या शिरुर लोकसभा मतदार संघाची बेरीज 9 आहे, तर माझी जन्मतारखेची बेरीजही 9 आहे. हा आकडा माझ्यासाठी लकी आहे. मोदीजी पंतप्रधान होत असताना सर्वात आधी उभा राहून समर्थन करणारा खासदार शिरूरमध्ये निवडून यायला हवा, असं म्हणत महेश लांडगे यांनी यांनी शिरुरमधून खासदारकी लढण्याची तयारी दाखली आहे.
शिरूरची जागा महायुतीत शिवसेनेकडे असल्याने तेथे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे नाव घेतले जात आहे. आता महेश लांडे यांनीही शिरूर लोकसभा लढवण्याचे संकते दिले आहेत. त्यामुळं कोल्हेंविरोधात महायुतीची उमेदवार कोण असणार हेच पाहणं महत्वाचं आहे.