‘सागर’वर आल्यावर आम्ही शांत बसणार नाही’; जरांगे-फडणवीस वादात राणेंची खुलेआम धमकी
Mitesh Rane On Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधारी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं थेट नाव घेत गंभीर आरोप केले आहेत. आरोप करत असतानाच अचानक जरांगेंनी आक्रमक भूमिका घेत फडणवीसांवर हल्लाबोल करीत ‘सागर’ बंगल्याकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावर बोलताना भाजपचे आमदार नितेश राणे यांनी जरांगे पाटलांनी थेट धमकीच दिली आहे. ‘सागर’ बंगल्यावर आल्यास आम्ही शांत बसणार नसल्याची धमकीच नितेश राणे यांनी दिली आहे.
Yashasvi Jaiswal : ‘यशस्वी’ ‘द्रविड’लाही भारी, आता टक्कर ‘विराट’ला; नवा विक्रम करत मिळवला दुसरा नंबर
नितेश राणे म्हणाले, मनोज जरांगे यांना नेमकं मराठा समाजाचे प्रश्न सोडवायचेत की फडणवीसांच्या नावाने राजकारण करायचं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं आहे, त्यापुढे आता कोर्टाची लढाई लढायची आहे. त्यासाठी फडणवीसांचा मोठा आधार आहे. मनोज जरांगे यांनी कधीही शरद पवार, नाना पटोले, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली नाही. पण देवेंद्र फडणवीस यांच्यावरच ते टीका करीत आहेत. सागर बंगल्यावर तुम्ही आल्यावर आम्ही शांत बसणार नसल्याची धमकीच नितेश राणेंनी दिली आहे.
तसेच मनोज जरांगे फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका करीत आहे. इतर नेत्यांवर ते कधीच बोलत नाहीत. त्यामुळे त्यांची ही नेमकी पार्श्वभूमी काय आहे. पहिल्या दिवसांपासूनच आम्ही जरांगेंना सांगत आहोत की, तुम्ही समाजाचे प्रश्न मांडा तुम्ही समाजाचे नेते आहेत, राजकारण करु नका, तुमची जी सगेसोयरेची मागणी आहे, त्यावर आज ना उद्या तोडगा निघेल. पण उठसूठ फडणवीसांवर टीका करायची राजकारण करायचं
धमक्या देत बसायचं, असं करु नका. तुमच्याकडे स्क्रिप्ट कोणाकडून येते तुमच्याकडे? असा सवाल नितेश राणेंनी केला आहे.
नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी निलंबित; डॉ. प्रशांत बोकारे स्वीकारणार पदभार
दरम्यान, मनोज जरांगे यांच्या आरोप करणारे त्यांचेच जुने सहकारी आहेत. या सहकाऱ्यांना मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये प्रामाणिकपणा दिसला नसेल तर त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची चूक काय आहे. तुम्ही तुमची माणसं सांभाळा. आम्ही हे सहन करणार नाही ‘सागर’ बंगल्याआधी आमच्या लोकांची एक भींत आहे, ही भींत पार पाडा मग ‘सागर’वर पोहोचण्याच विचार करा, असंही नितेश राणे म्हणाले आहेत.