नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी निलंबित; डॉ. प्रशांत बोकारे स्वीकारणार पदभार

नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी निलंबित; डॉ. प्रशांत बोकारे स्वीकारणार पदभार

Nagpur University : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी (Subhash Choudhari) यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे चौधरी यांच्याविरोधात अनेक तक्रारी आल्याने राज्यपालांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. चौधरी यांच्यानंतर आता कुलगुरु पदाचा पदभार डॉ. प्रशांत बोकारे यांच्याकडे देण्यात आला आहे. हा पदभार अतिरिक्त स्वरुपात देण्यात आला असून कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Manoj jarange आंदोलन हिंसक झाल्यास जबाबदारी घेणार का? स्पष्टीकरण मागत हायकोर्टाचा सवाल

राज्यपालांनी या तक्रारींवर बाजू मांडण्यासाठी बुधवार २१ फेब्रुवारीला कुलगुरूंना बोलावले होते. मात्र, डॉ. चौधरींच्या उत्तराने राज्यपाल कार्यालयाचे समाधान न झाल्याने त्यांनी निलंबनाची कारवाई केल्याची माहिती आहे. कुलगुरू पदाचा प्रभार गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. दरम्यान, बाविस्कर समितीच्या अहवालानुसार ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्याकडे कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.

Manohar Joshi : बाळासाहेबांचा एक आदेश अन् मनोहर जोशींनी क्षणात मुख्यमंत्रिपद सोडलं

डॉ. चौधरी आता विद्यापीठाचे कुलगुरु नाहीत, तरीही त्यांच्या अडचणी चांगल्याच वाढत असल्याचं दिसून येत आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचेही आरोप करण्यात येत आहेत. सुभाष चौधरी यांनी केलेले भ्रष्टाचाराचे प्रकरण पाहता त्यांची सीआयडी चौकशीही मागणीही करण्यात येत आहे. ही मागणी सिनेट सदस्यांकडूनच करण्यात येत आहे. तसेच ‘एमकेसीएल’ला कंत्राट दिल्याचाही ठपका डॉ सुभाष चौधरी यांच्यावर ठेवण्यात आला आहे. एकूणच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इतिहासातील ही कदाचित पहिलीच कारवाई असल्याचे सांगितलं जात आहे.

‘अजितदादांना उपमुख्यमंत्री केलं नसतं तर सरकार टिकलं नसतं’; तटकरेंनी आव्हाडांना सुनावलं

दरम्यान, नागपूर विद्यापीठ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यात कायम वाद होताना पाहायला मिळालं आहे. सोबतच परीक्षा संदर्भाची नियोजन असेल किंवा सिनेट कौन्सिल निर्णयासंबंधित कुलगुरू यांनी घेतलेले निर्णय असतील, या विरुद्ध विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी विरोधात अनेक तक्रारी केल्या गेल्या होत्या. त्यानंतर राज्यपाल रमेश बैस यांनी ही कारवाई केली आहे.

काही दिवसांपूर्वी नागपूर विद्यापीठात युवक काँग्रेसच्यावतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा जाळण्यात आल्याचा प्रकार घडला होता. या प्रकारानंतर अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेने आक्रमक भूमिका घेत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची मागणी केली होती. त्यावेळी विद्यापीठाकडून पोलिसांत तक्रार देण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप एबीव्हिपीकडून करण्यात आला. त्यानंतर एबीव्हिपीकडून पोलिसांत तक्रार देण्यात आली होती. तेव्हाही सुभाष चौधरी अडचणीत आले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज