“…तर भावाच्या पक्षात जाऊ शकते” : नितीन गडकरींसमोरच पंकजा मुंडेंचा भाजपला इशारा?

“…तर भावाच्या पक्षात जाऊ शकते” : नितीन गडकरींसमोरच पंकजा मुंडेंचा भाजपला इशारा?

दिल्ली : “मी भाजपची आहे पण, भाजप ही पार्टी माझी थोडीच आहे. राष्ट्रीय समाज पक्ष माझं माहेर आहे. माझ्या भावाचं घर आहे. वडिलांशी लढाई झाली तर भावाच्या घरीही जाऊ शकते” असं सुचक वक्तव्य करत भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी भाजपला इशारा दिला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने दिल्लीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी भाजपला इशारा दिला आहे. विशेष म्हणजे यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी देखील उपस्थित होते. (Pankaja Munde Warned in front of Senior leader Nitin Gadkari)

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

आपल्याला वडील किंवा नेता स्वप्न दाखवत असतो. मला माझ्या वडिलांनी मला सांगितलं की, मोठं स्वप्न बघं पण गरीब आणि दुर्लक्षित घटकातील लोकांसाठी बघ. आपल्या मोठेपणासाठी नको. माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की, महादेव जानकर एक नाही, हजार बनावेत. महादेव जानकर सारखे नेते बनावेत, जे हजारो नेत्यांना बनवावेत. मी तर त्यांच्याशी सारखी भांडत असते. माझं अर्ध लक्ष तर राष्ट्रीय समाज पक्षावरच असतं. तुम्ही हे करा, ते करा, इकडे जावा, तिकडे जावा.

BJP : पक्ष माझा नाही; सूचक विधान करत पंकजा मुंडेंनी वाढवलं भाजपचं टेन्शन

ते सांगतात मी भांडते ते खरं आहे. कारण रासप म्हणजे माझं माहेरचं आहे. माझ्या भावाचं घर आहे. इकडे वडिलांशी भांडणं झाली तर तिकडे भावाच्या घरी जाऊच शकतो.  तुम्ही म्हणताय ताईची पार्टी, ताईची पार्टी. माझी कुठली पार्टी? मी भाजपची आहे. भाजप माझी थोडीच आहे. भाजप खूप मोठा पक्ष आहे. मी भाजपची होऊ शकते. पार्टी माझी होऊ शकत नाही,

गोपीनाथ मुंडे असते तर मी आज… रासपचे नेते महादेव जानकरांचं मोठं विधान

मला आता भीती वाटत नाही. कशाचीच भीती वाटत नाही. भीती न वाटणं हे आमच्या रक्तातच आहे. कशाची चिंता नाही. काही नाही मिळालं तर मी ऊस तोडायला जाईल, महादेव जानकर जातील मेंढ्या चरायला. आणखी काय होईल ? आम्हाला काही गमवायचंच नाही. आम्हाला आयुष्यात कोणत्याही गोष्टीची आस्था, अपेक्षा आणि लालसा नाही, असेही मुंडे म्हणाल्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube