तुमचा एक ब्राम्हण नगरसेवक दाखवा, चंद्रकांत पाटलांचे विरोधकांना आव्हान
Chantrakant Patil : पुण्यातील कसबा पोट निवडणुकीवरून भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारले की भाजपमध्ये ब्राम्हण समाजावर अन्याय होतो का? कारण कसबा पोट निवडणुकीत मुक्त टिळक यांच्या घरात उमेदवारी न देता भाजपने दुसऱ्याला उमेदवारी दिली. या प्रश्नाचे उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले… ज्या पक्षाने आपल्या चिन्हावर साधा नगरसेवक देखील निवडून आणला नाही ते अकरा ब्राम्हण आमदार असलेल्या भरतीत जनता पार्टीत ब्राह्मण समाजावर अन्याय होतो असं म्हणतात. पाटील झी 24 तासच्या एका मुलाखतीत बोलत होते.
पाटील पुढे म्हणाले संपूर्ण महाराष्ट्रात चंद्रपूर पासून ते मुबई आणि धुळ्यापासून ते सिंधुदुर्ग पर्यंत इतर कोणत्याही पक्षाने एकतरी नगरसेवेक आपल्या पक्षात दाखवावा मग बोलावे. भाजपमध्ये जर एवढ्या प्रमाणात ब्राम्हण आमदार आहेत तर मग भाजपमध्ये ब्राम्हण समाजावर अन्याय होण्याचं कारण काय. म्हणून सांगतो यांचा काही संबंध नाही, ज्यांना काही माहित नाही त्यांनी बोलू नये.
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ‘अवकाळी’च्या नुकसान भरपाईसाठी 177 कोटी
मुंबई महानगर पालिकेत शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा अपवादात्मक एखादा नगरसेवक ब्राम्हण समाजाचा असेल परंतु काँगेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या पक्षात ब्राम्हण नगरसेवक तरी दाखवावा मग आमच्यावर आरोप करावेत.
तसेच आमच्याकडे ब्राम्हण समाजाचे आमदारच नाही तर खासदार देखील आहे. मग ही आकडेवारी पाहून ब्राम्हण समाजाच्या लक्षात येत नसेल का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला.