तुमच्या बुडाखाली अंधार बघा, बावनकुळे महाविकास आघाडीवर बरसले !

तुमच्या बुडाखाली अंधार बघा, बावनकुळे महाविकास आघाडीवर बरसले !

Chandrasekhar Bawankule : ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आजपासून दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. यावेळी ते पोहरादेवीच्या दर्शनासाठी यवतमाळला आले होते. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी ठाकरेंवर टीका करत अडीच वर्षांत ज्यांना अडीच दिवसही मंत्रालयात जायला वेळ मिळाला नाही तेच आता विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत, अशी टीका केली होती. त्यावरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली. भाजप पक्ष आता काहीही बोलायच्या लायकीचा राहिला नाही, त्यांनी दोषारोप करणं सोडून द्यावं, अन् घरात घुसलेल्या बाजारबुणग्यांना सांभाळावं, अशी टीका केली होती. त्यांच्या याच  टीकेला आता बावनकुळेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. (Chandrasekhar Bawankule On Uddhav Thackeray they said People left Shiv Sena because of your refusal)

उद्धव ठाकरेंच्या टीकेवरला प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. ‘तुमच्या नाकर्तेपणामुळं लोक शिवसेना सोडून बाहेर पडले, तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून राज्य चालवता आले नाही आणि पक्षप्रमुख म्हणून पक्ष सांभाळता आला नाही’ अशा शब्दात त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत ठाकरेंवर टीका केली.

बावनकुळेंनी ट्विट केलं की, उद्धव ठाकरेजी तीन वर्षांपूर्वी तुम्ही महाविकास आघाडी घरात घुसवून घेतली होती. याचा तुम्हाला विसर पडला काय? ज्यांना आज तुम्ही बाजारबुणगे म्हणता, कधीकाळी त्यांच्याच जीवावर तुम्ही मुख्यमंत्री झालात. तुमच्या नाकर्तेपणामुळे लोक शिवसेना सोडून बाहेर पडले, हे विसरू नका. तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून राज्य चालवता आलं नाहीत आणि पक्षप्रमुख म्हणून पक्षही सांभाळू शकले नाहीत, असं टीका बावनकुळेंनी केली.

आपल्याच मुलीला रीना दत्ता म्हणाली, ‘…तर तू जिवंत राहायची नाहीस’; आमिरच्या मुलीवर ही वेळ का आली? 

ते म्हणाले, तुम्हाला मिळत असलेला “प्रदंड प्रतिसाद” पाहून तुमचे उरलेले साथीदारही तुमची साथ सोडत आहेत आणि येत्या काळातही लोक तुमची साथ सोडणार आहेत. त्यामुळे भाजपवर टीका करण्यापूर्वी बुडखालचा अंधार बघा, अशा शब्दात उद्धव ठाकरेंना ठणकावलं. दरम्यान, आता बावनकुळेंच्या टीकेला ठाकरे गट काय उत्तर देते, हेच पाहणं औत्सुक्याचं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube