पक्षनेत्याला विचारून भूमिका मांडा गावागावांत खडे फोडून…बच्चू कडूंना बावनकुळेंनी सुनावलं
Chandrashekhar Bavankule on Bachhu Kadu कडू यांनी शिंदेंच्या मुख्यमंत्री होण्याबाबत भाष्य केले. यामुळे बावनकुळेंनी त्यांना चांगलच सुनावलं आहे.
Chandrashekhar Bavankule angry on Bachhu Kadu on his statement about CM and DCM : शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री होण्याबाबत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जाणार असल्याच्या मुद्द्यावर भाष्य केले. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र यावरून आता भाजपचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी कडू यांनी चांगलच सुनावलं आहे.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
राज्यामध्ये महायुतीला 51 टक्के बहुमत आहे. तसेच आमचं सरकार मजबूत आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जाणार हा निर्णय घेण्याचा अधिकार कुणाला नाही. त्यामुळे गावागावांमध्ये असे खडे फोडू नये. तसेच प्रत्येकाला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं वाटतं. पण म्हणून महायुतीच्या समन्वय समितीने ठरवलेल्या नियमांचं उल्लंघन करू नये. आपल्या नेत्याला विचारून आपल्या भूमिका मांडाव्यात. अन्यथा त्यावर विचार करावा लागेल.
आमदार बच्चू कडू काय म्हणाले?
आमदार बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश करून आमदार झाल्यानंतर पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय काम सुरू केलं आहे. त्यात ते जरी महायुतीत असले तरी देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारवर निशाणा साधतच आहेत. याच दरम्यान भंडाऱ्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलताना कडू यांनी त्यांच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे हेच आपल्याला मुख्यमंत्री करायचे आहेत. हे प्रत्येक शिवसैनिकाने लक्षात ठेवावं. तसेच यावेळी ते म्हणाले की, आम्हाला आपेक्षा आहे की, देवाभाऊंच प्रमोशन व्हावं आणि शिंदे मुख्यमंत्री व्हावेत. तसेच विदर्भच शिंदेंना मुख्यमंत्री करेल याची मला खात्री आहे.