Chandrashekhar Bawankule दिल्लीत, पाठोपाठ आशिष शेलारही दाखल; राजकीय चर्चा सुरु
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज दिल्लीत दाखल झाले आहे. त्यांच्या पाठोपाठ भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार देखील दिल्लीत आल्याची माहिती मिळाल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. त्यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील स्पष्टीकरण दिले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीत दाखल झाल्यावर मोठया राजकीय चर्चा सुरु झाल्या त्यावर बोलताना ते म्हणाले की “मी राजकीय कारणासाठी नाही तर प्रशासकीय कारणासाठी दिल्लीत आलो आहे. त्यामुळे बाकी चर्चाना काही अर्थ नाही.” आशिष शेलार यांच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, “आशिष शेलार हे दिल्लीमार्गे बंगलोरला निघाले आहेत. त्यामागे काही राजकीय अर्थ नाहीत.”
अजितदादांना कसं ट्रॅक कराल?; सुप्रिया सुळेंनी दिली आयाडिया!
गेल्या काही दिवसापासून विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज असल्यामुळे ते भाजपसोबत जातील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यावर देखील प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. त्यावर बोलताना ते म्हणाले, “अजित पवार यांच्याबद्दल मला काही माहित नाही.” असं स्पष्टीकरण दिले.
ते पुढे म्हणाले की, “भाजपमध्ये सध्या प्रत्येक बूथवर २५ लोकांचे पक्षप्रवेश करणार आहेत. या महिन्यात बूथ पातळीवर राज्यभरात तब्बल २५ लाख प्रवेश होणार आहेत. पक्षात आलेल्या सर्वच लोकांचे आम्ही स्वागत करतो. आमच्या पक्षात सर्वच लोकांचे स्वागत आहे, फक्त भाजपमध्ये विचारधारेचा प्रश्न आहे. त्यामुळे आमच्या विचारधारेवर कोणीही काम करणार असेल तर आम्ही सगळ्यांना पक्षात घेऊ.” असं उत्तर त्यांनी दिलं.
महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा इतिहास अन् मानकरी