Chhagan Bhujbal : साहेब एकाएकी असा निर्णय घेणार नाही, भुजबळांनी सांगितली पार्श्वभूमी

Chhagan Bhujbal : साहेब एकाएकी असा निर्णय घेणार नाही, भुजबळांनी सांगितली पार्श्वभूमी

Chhagan Bhujbal On Sharad Pawar Resignation back : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Resignation) यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अखेर मागे घेतला. आज पत्रकार परिषद घेत त्यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अध्यक्षपदाची सूत्रे पुन्हा स्वीकारत असल्याचे जाहीर केले. शरद पवार कोणता निर्णय घेतात याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं होतं. आज पत्रकार परिषदेत आपण कार्यकर्त्यांच्या भवानांचा आदर करत अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेत आहे पण कोणतंही जबाबदारीचं पद स्वीकारणार नाही असे शरद पवार यांनी सांगितले.

त्यानंतर आता त्यांच्या या निर्णयावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. यावेळी पत्रकारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अखेर मागे घेतला. यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘मी संपूर्ण घडमोडीत मी नव्हतो. राजीनाम्यावर त्यांना जेव्हा विचारले तेव्हा त्यांचे म्हणणे होते. मी सांगितले असते तर राजीनामा देऊ दिला नसता. म्हणून विचारलं नाही. अजित दादांना माहीत होते. असे मला वाटते. प्रफुल्ल पटेल यांना माहीत असावे. बाकीच्यांना माहीत नसावे. कोर्टात गेलो होतो नंतर कळलं तर धक्का बसला. विशेषतः त्यांच्या घरच्यांना माहिती होते हे नक्की. पवार साहेबांसारखा नेता एकाएकी असा निर्णय घेईल असे नाही. अशी पार्श्वभुमी यावेळी भुजबळांनी सांगितली.

Sharad Pawar : पक्षातील बंडाळीवर राजीनामा नाट्य, पवारांच्या राजीनामा मागे घेण्यावर शिरसाटांचा टोला

दुसरीकडे पवारांच्या राजीनामा मागे घेण्याच्या निर्णयावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. वेळी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी पवारांच्या राजीनामा मागे घेण्याच्या निर्णयावर चांगलीच टोलेबाजी केल्याचं पाहायाला मिळालं. शिरसाट म्हणाले, ‘शरद पवारांनी केलेलं राजीनामा नाट्या हे पक्षातील बंड शमवन्यासाठी केलं होत. त्यातून त्यांनी आपला बडगा दाखवून देत जो कुणी पक्षातील विरोध करत आहे. त्यांना हा धडा होता.’

त्यामुळे असा प्रयत्न पुन्हा कराल तर मी माझा बडगा दाखवेल असा इशाराच त्यांनी जणू यातून दिला आहे. दरम्यान शिरसाट असं देखील म्हणाले आहेत की, जेव्हा शरत पवारांनी राजीनामा दिला. त्यावेळी सुप्रिया सुळेंच्या चेबऱ्यावर कोणताही तणाव दिसत नव्हता. त्यामुळे हे नाटक होतं हे स्पष्ट आहे. अशी प्रतिक्रिया पवारांच्या राजीनामा मागे घेण्याच्या निर्णयावर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी दिली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube