दोन्ही राष्ट्रवादीचे लवकर मनोमिलन व्हावे, मी मध्यस्थीसाठी तयार; अजितदादांच्या नेत्याचं मोठं विधान

दोन्ही राष्ट्रवादीचे लवकर मनोमिलन व्हावे, मी मध्यस्थीसाठी तयार; अजितदादांच्या नेत्याचं मोठं विधान

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसशी जळवून घेण्याचे संकेत दिले. भविष्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी (NCP)एकत्र आल्यास आश्चर्य वाटणार नाही, असं सूचक वक्तव्य पवारांनी केलं. त्यांच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यावर आता छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी भाष्य केलं.

नालेसफाईची कामे बेभरवशाची,आशिष शेलार कामाबाबत असमाधानी 

शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याविषयी आशेचा किरण दाखवला. त्यानुसार, आता हे मनोमिलन लवकरात लवकर व्हावे, असं विधान भुजबळांनी केलं.

छगन भुजबळ यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना शरद पवारांच्या वक्तव्याविषयी विचारले असता ते म्हणाले की, शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याविषयी आशेचा किरण दाखवला आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा निश्चितच होईल. पण हे मनोमिलन लवकरात लवकर झाले पाहिजे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर माझी मध्यस्थी करण्याची तयारी आहे. पण अजित पवार हे पवार साहेबांच्या घरात वाढलेत. त्यामुळं त्यांचं मनोमिलन घडवून आणण्यासाठी मध्यस्थी करण्याची गरज आहे, असं मला वाटत नाही, असं भुजबळ म्हणाले.

इंडिया आघाडी सक्रीय नाही, राहुल गांधींनी आणखी…; पवारांचा विरोधकांना काय सल्ला? 

तर महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनीही या प्रकरणी आपली भूमिका मांडली. हा वरिष्ठ पातळीचा निर्णय आहे. आम्ही अजित पवारांच्या नेतृत्वाखाली काम करतो. आम्ही सामान्य कार्यकर्ते आहोत. त्यामुळे मी यावर फार काही बोलू शकत नाही. वरिष्ठ जो काही निर्णय घेतील, त्यासोबत आम्ही राहू, असं तटकरे यांनी म्हटलं.

सोलापूरचे नेते सकारात्मक
उल्लेखनीय बाब म्हणजे, शरद पवार गटाचे सोलापूरचे नेते अजित पवार यांच्या पक्षासोबत जाण्यासाबाबत खूप सकारात्मक आहेत. येथील आमदारांनी १५ दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतली होती आणि अजित पवारांसोबत जाण्याचा आग्रह धरला होता. विरोधी पक्षात असल्याने निधी मिळविण्यात मोठ्या अडचणी येत आहेत, असं या नेत्यांनी म्हटलं होतं.

पवार काय म्हणाले होते?
आपल्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन मतप्रवाह आहेत. एका गटाला वाटतं की आम्ही एकत्र यावं, अजित पवारांसोबत जावं असं वाटतं. तर दुसऱ्या गटाला वाटतं की, अजितदादांसोबत जाऊ नये, असं पवार म्हणाले. इतकंच नाही तर संसदेमध्ये सत्ताधारी पक्षासोबत बसायचं की, विरोधी पक्षासोबत बसायचं यांचा निर्णय सुप्रिया सुळेंनी घ्यावा, असं सूचक वक्तव्यही पवारांनी केलं. एकत्र येण्यासंदर्भात सुप्रिया आणि अजित यांनी बसून ठरवावं, दोन्ही गट भविष्यात एकत्र आल्यास आश्चर्य वाटू नये. आमची मंडळी विभागली गेली असली तरी ती विचाराने एक आहे, असंही पवार म्हणाले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube