Budget Session : तुम्ही ७० हजार कोटी पाण्यात घातले, मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना धुतलं
मुंबई : माझ्याकडे राज्यभरातून सोन्यासारखीच माणसं येतात, चहापाणी करणं ही महाराष्ट्राची संस्कृती आता चहापाणी करायचा नाही का? या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोध पक्षनेते अजित पवारांना प्रत्युत्तर दिलंय.वर्षा बंगल्याच्या खर्चावरुन अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर गंभीर आरोप केले होते. या आरोपांवर अर्थसंकल्पीय अधिवेशनात अजित पवारांना खडेबोल सुनावले आहेत.
17 कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस…#SanjayRathod #Budgetsession2023https://t.co/B4ihclRUSK
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) March 3, 2023
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अजित पवारांकडून मला ही अपेक्षा नव्हती. कोविड काळात अडीच वर्षांसाठी वर्षा बंगला बंद होता. त्यावेळी वर्षा बंगल्यावर जाण्यासाठी कोविड तपासणीचं प्रमाणपत्र बंधनकारक होतं. त्यावेळी अजित पवारांना फूल परवानगी होती असा खुलासा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे.
तसेच कोविड काळात वर्षा बंगल्यावर माणस नसतांना फेसबुक लाईव्ह, ऑनलाईन सुरु होतं. त्यावेळी तिथं माणसं नसतानाही वर्षा बंगल्याचं महिन्याचं बिल किती झालं? याची माहिती नाही घेतली तुम्ही? असा खोचक सवाल मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी अजित पवार यांना केला आहे.
अजित पवार म्हणाले, चहात सोन्याचं पाणी टाकलं काय, तर दादा माझ्याकडे राज्यभरातून सोन्यासारखी माणसं येतात. त्यांना चहापाणी पाजू नको का? ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे ना? या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अजित पवारांना चागंलंच खडसावलंय.
दारुमाफियांच्या सांगण्यावरुन हल्ला.., आमदार प्रज्ञा सातवांचा विधानसभेत खुलासा
तसेच वर्षावर येणाऱ्या लोकांना आम्ही त्यांना बिर्याणी खाऊ घालत नाही. पण चहापाणी देऊ शकत नाही का? आज अजित पवार यांनी चहापाण्याचा हिशेब काढला. मग आम्हाला सांगा तुम्ही ७० हजार कोटी सिंचनासाठी पाण्यात घातले. तरीही शून्य पॉईंट जमीन सिंचनाखाली आली नाही. हे मी म्हणत नाही, तर पृथ्वीराज चव्हाण आणि कॅगनेच म्हटले असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
दरम्यान, हे सगळं मी स्वत काढत नाही, समोरुन निघाल्यानंतर मी काढत आहे, पोरं सोरं बोलले तर चालतात हो पण तुम्ही एक जबाबदार विरोध पक्षनेते असल्याचंही खोचक विधान त्यांनी केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानावरील जेवणाचे बील २ कोटी ३८ लाख रुपये आले आहे. सरकार चहामध्ये सोन्याचा अर्क टाकते का? असा खोचक सवाल अजित पवारांनी केला होता.