‘… तसाच मी विरोधकांना पाण्यात दिसतोयंं’; संताजी, धनाजींचं उदाहरण देऊन मुख्यमंत्र्यांची टीका

‘… तसाच मी विरोधकांना पाण्यात दिसतोयंं’; संताजी, धनाजींचं उदाहरण देऊन मुख्यमंत्र्यांची टीका

Cm Eknath Shinde : मुघलांच्या घोड्यांना जसे पाण्यात संताजी धनाजी दिसायचे तसाच मी दिसत असल्याची खरमरीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Cm Eknath Shinde) यांनी विरोधकांवर केली आहे. शिवसेनेत बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपशी युती करुन सत्ता स्थापन केली. तेव्हापासून विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धारेवर धरलं जात असल्याचं दिसून येत आहे. विरोधकांच्या टीका-टीप्पण्यावर अखेर मुख्यमंत्र्यांनी संताजी धनाजींचं उदाहरण देत चांगलचं फटकारलं आहे. बुलढाण्यात ‘शासन आपल्या दारी कार्यक्रम’ पार पडला. या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

‘हिंमत असेल तर कारवाई करून दाखवा’; पटोलेंचे अजितदादांना आव्हान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Cm Eknath Shinde) म्हणाले, मी जेव्हापासून मुख्यमंत्री झालो आहे, तेव्हापासून विरोधकांकडून एकच सूर लावण्यात येत आहे. सरकार कोसळणार अशा टीका विरोधकांकडून केल्या जात आहेत, पण आता ते ज्योतिष संपले आहेत. आता ते म्हणतात मुख्यमंत्री बदलणार आहेत, अखेर अजितदादा आमच्यासोबत आले पण सरकार काही कोसळलं नाही, आत्ता 215 आमदारांचं सरकार काम करत असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

‘शासन आपल्या दारी’साठी मराठा आंदोलन चिरडण्याचा डाव; अशोक चव्हाणांचे गंभीर आरोप

तसेच विरोधक एका शेतकऱ्याच्या पोराच्या मागे लागलेत, मुघलांच्या घोड्याला जसे पाण्यात संताजी, धनाजी दिसायचे तसाच मी विरोधकांना पाण्यात दिसत आहे, का तर मी जनतेची कामं करतो म्हणून? जनतेच्या विकासाची कामे करतो हा माझा गुन्हा आहे काय? मी सोन्याचा चमचा घेऊन आलो नाही म्हणून? मुख्यमंत्र्याला कसं बदनाम करायंच हाच विचार ते करीत असल्याची टीका एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी केली आहे.

विरोधकांना टीका करायच्यात करु देत, जोपर्यंत जनता माझ्यासोबत आहेत, तोपर्यंत माझं बाल बाका करु शकत नसल्याचं ते म्हणाले आहेत. दरम्यान, 2019 च्या निवडणुकीत आम्ही लोकांना मते मागितली, निवडणुकीच्या निकालानंतर खुर्चीसाठी सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती देण्याच धाडस उद्धव ठाकरेंनी केलं आहे. केलं पण आम्ही बाळासाहेबांच्या विचारांना जिथं मूठमाती दिली, तिथं सर्वसामान्यांचं सरकार स्थापन करण्यासाठी धाडस केलं असल्याचंही ते म्हणाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube