राज्यात पुन्हा राजकीय भूकंप? एकनाथ शिंदे, अजित पवारांना काँग्रेसकडून थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर

राज्यात पुन्हा राजकीय भूकंप? एकनाथ शिंदे, अजित पवारांना काँग्रेसकडून थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर

Nana Patole On Eknath Shinde :  महाराष्ट्र विधिमंडळाचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून लाडकी बहीण योजना, तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून विरोधक महायुती (Mahayuti) सरकारवर चारही बाजूने टीका करताना दिसत आहे. त्यामुळे महायुती सरकार बॅकफूटवर जाताना दिसत आहे. तर दुसरीकडे महायुती सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात कोल्ड वॉर सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. नुकतंच अजित पवार (Ajit Pawar) यांनी 2025-26 साठी अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना एकनाथ शिंदे यांनी खुर्च्यांच्या अदलाबदलीवरून एकनाथ शिंदे आणि त्यानंतर अजित पवारांनी केलेल्या विधानाची चांगलीच चर्चा रंगली होती. तर आता या विधानावरुन काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole ) यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

नागपुर येथे माध्यमांशी बोलताना, नाना पटोले यांनी विविध विषयांवर भाष्य केले. तसेच त्यांनी यावेळी होळीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिले. यावेळी नाना पटोले म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांची प्रकृती ठीक व्हावी. ते आजकाल खूप फेकतात, त्यांनी मोदींप्रमाणे खोटं बोलू नये, आधी जे देवेंद्र फडणवीस होते, राज्यासाठी त्यांची लढाई चालायची. ते त्यांनी करावं अश्या शुभेच्छा देतो. असं यावेळी नाना पटोले म्हणाले.

तर यावेळी त्यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची आवस्था फार वाईट आहे. पुढच्या काळात त्यांचा पक्ष टिकेल की नाही माहिती नाही. भाजप त्यांना जगू देत नाही. अजित पवार यांनी सादर केलेला बजेट त्यांच्या मनातील बजेट नाही, हे बजेट बिना-पैशाचे आहे असं म्हणत त्यांनी दोघांना काँग्रेससोबत येण्याची ऑफर दिली.

दोघांनाही काही दिवस मुख्यमंत्री बनवू

यावेळी नाना पटोले म्हणाले की, एकनाथ शिंदे यांची अवस्था फार वाईट झाली आहे. त्यांच्या सगळ्या योजना बंद करण्यात येत आहे. त्यांच्या लोकांची सुरक्षा काढली गेली, पण भाजपच्या लोकांची सुरक्षा आहे. त्यांमुळे त्यातून त्यांनी शिकावं, आम्ही त्यांच्यासोबत आहोत. त्यांनी आमच्यासोबत यावं, आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत. आम्ही त्यांची काळजी घेऊ. त्यांच्यात मुख्यमंत्री पदासाठी ओढ लागली आहे.

वोट जिहाद प्रकरण, मुफ्ती इस्माईल सभागृहात भडकले, किरीट सोमय्यांवर हल्लाबोल

आम्ही दोघांनाही काही दिवस मुख्यमंत्री बनवू. अजित पवार यांना काही दिवस आणि एकनाथ शिंदे यांना काही दिवस मुख्यमंत्री बनवू असं यावेळी नाना पटोले म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube