आम्हाला अर्थसंकल्प, सहकार, शेती सगळं कळतं; फडणवीसांचा अजितदादांना योग्य संदेश

आम्हाला अर्थसंकल्प, सहकार, शेती सगळं कळतं; फडणवीसांचा अजितदादांना योग्य संदेश

DCM Devendra Fadanvis : शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज नाशिक येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. पण ठाकरेंवर निशाणा साधताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री शिंदेंसमोर देखील योग्य संदेश दिल्याचे बोलले जात आहे.

शिंदे गटाचे आमदार ज्यावेळी महाविकास आघाडी सरकार मधून बाहेर पडले, त्यानंतर त्यांनी निधी वाटपावरून अजित पवारांवर आरोप केले होते .अजित पवार हे आपल्या विरोधी उमेदवाराला निधी देत असल्याचा आरोप शिंदे गटाच्या आमदारांनी केला होता. तसेच निधी वाटपामध्ये आपल्यासोबत दुजाभाव झाला असल्याचेही शिवसेनेच्या आमदारांनी म्हटले होते.

अजितदादांची प्रत्येक फाईल माझ्याकडे येणार! नाराज आमदारांना फडणवीसांचा ‘शब्द’

त्यामुळे शिंदे सरकार मध्ये अजितदादांना अर्थ खाते देण्यावरुन शिंदे गटाकडून जोरदार विरोध करण्यात येत होता. पण अजितदादांना अर्थ खातेच देण्यात आले. याच मुद्द्यावर बोलताना फडणवीसांनी आधीच्या मुख्यमंत्र्यांना शेतीतील, सहकारातलं काहीच कळत नव्हतं. पण आम्हाला सगळ्यातलं सगळं माहिती आहे, असे सांगत फडणवीस यांनी जाहीरपणे अजितदादांना योग्य संदेश दिल्याचे दिसून आले आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

आम्हाला  टीका करायची नाही. पण आमच्या आधीच्या मुख्यमंत्र्यांच वाक्य ठरलं होतं. मला अर्थसंकल्पातलं फार कळत नाही, मला सहकारातलं काहीच कळत नाही, मला शेतीतलं काहीच कळत नाही, शेवटी पवार साहेबांनी त्या ठिकाणी पुस्तक लिहिलं त्याच्यात सांगितले यांना राजकारणातलं काहीच कळत नाही, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. पुढे ते म्हणाले की,  त्याच्यामुळे आता असं नाही आहे.  आम्हाला अर्थसंकल्पातले कळतं, आम्हाला सहकारातलं कळतं, आम्हाला शेतीतलं ही माहिती आहे.

“तुम्ही माझी भावकी… सरकारला माझंही तिसरं इंजिन : अजितदादांची केंद्रीय मंत्र्यांच्या भाषणात सुधारणा

दरम्यान, फडणवीस यांच्या या विधानावरून त्यांनी निधी वाटपामध्ये अजित पवारांची ‘दादा’गिरी चालणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या  विधानावरुन शिंदे गटातील आमदारांना दिलासा देण्याचा देखील हा एक प्रयत्न असू शकतो. आगामी काळात निधीवाटप कशाप्रकारे होते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube