मराठा आरक्षणाला उपमुख्यमंत्र्यांचा अडथळा! …तर मी पदाचा राजीनामा देईल; फडणवीसांचं स्पष्टीकरण
Devendra Fadnvis On Manoj Jarange : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) सांगावं, मराठा आरक्षणाला माझा अडथळा आहे, तर मी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन राजकारणातून संन्यास घेणार असल्याचं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी दिलंय. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचंय पण देवेंद्र फडणवीस देऊ देत नसल्याचा आरोप मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी केला. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी आपला खुलासा केलायं. मुंबईत ते माध्यमांशी संवाद साधत होते.
माझ्या लाडक्या बहिणींना रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा!
विविध योजनांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सक्षम करण्याचे प्रयत्न आम्ही करत आहोत, हीच आमची रक्षाबंधनाची भेट…
जरांगे पाटील, रामदासभाई, वाझे अशा अनेक विषयांवर माध्यमांशी संवाद..(मुंबई । 19-8-2024)… pic.twitter.com/5y3RCJ4guX
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 19, 2024
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मनोज जरांगे यांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे. राज्याचे सर्व अधिकार मुख्यमंत्र्याकडे असतात. मंत्रिमंडळातील सर्व मंत्री त्यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असतात. एकनाथ शिंदे आणि आम्ही एकत्रितपणे काम करतो, त्यांना माझं पाठबळ आहे. मराठा आरक्षणाला माझ्या अडथळ्याबाबतचा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारा, शिंदे यांचा आरक्षण देण्याबाबतचा प्रयत्न मी थांबवला असं त्यांनी सांगितलं तर मी माझ्या उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन राजकारणातून संन्यास घेणार असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.
BB Marathi: रक्षाबंधनाच्या दिवशी भावा बहिणीच्या नात्यात पडली फूट; निक्की अन् छोटा पुढारीमध्ये राडा
तसेच आजपर्यंत मराठा समाजाबाबत जे जे निर्णय घेण्यात आले आहेत, ते निर्णय मी आणि एकनाथ शिंदे यांनी घेतलेले आहेत. जाणीवपूर्वक असा नरेटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. यावेळी बोलताना फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवरुन विरोधकांवर निशाणा साधला आहे. निवडणूक आयोगाकडून अद्याप महाराष्ट्राच्या निवडणूक जाहीर करण्यात आलेल्या नाहीत त्यावरुन विरोधकांकडून टीका केली जात आहे. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, प्रत्येक गोष्टीचं राजकारण करणे चुकीचं आहे.
विरोधकांना सत्तेत असताना बहिणींची आठवण झाली नाही…
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना बंद पाडण्यासाठी विरोधकांकडून अनेक प्रयत्न केले गेले. विरोधक न्यायालयापर्यंत गेले मात्र, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना बंद पाडता आली नाही. मला या गोष्टीचा आनंद आहे. ही योजना आपल्याकडे कशी खेचता येईल याचा प्रयत्न सध्या विरोधकांकडून सुरु आहे.सत्तेत असताना विरोधकांना लाडक्या बहिणींची आठवण का आली नाही? असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी केलायं.
काय म्हणाले होते मनोज जरांगे?
देवेंद्र फडणवीस यांनी मराठा संपवला, मुस्लिम संपवला, धनगर संपवला, मोठ्या जाती संपवण्याचे काम त्यांनी केले. त्यांनी पाच वर्ष काम केलं नाही फक्त फोडाफोडी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरक्षण देतील पण, त्यांना फडणवीस आरक्षण देऊ देत नसल्याचे जरांगे पाटील म्हणाले होते.