‘त्या’ जाहिरातीवर दीपक केसरकरांचं मोठं विधान, म्हणाले मुख्यमंत्र्यांनी…

‘त्या’ जाहिरातीवर दीपक केसरकरांचं मोठं विधान, म्हणाले मुख्यमंत्र्यांनी…

Deepak Kesarkar News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहिरातीवर भाष्य केल्यानंतर आता शिंदे सरकारचे मंत्री दीपक केसरकरांनी (Deepak Kesarkar) मोठा खुलासा केला आहे. चुकीची जाहिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दाखवून केलेली नव्हती, असा खुलासा दीपक केसरकरांनी केला आहे. (Deepak Kesarkar’s Speak on Chief Minister advertisement)

तोपर्यंत औरंगाबादच नाव वापरणार, राज्य सरकारची उच्च न्यायालयाला ग्वाही

शिंदे सरकराने केलेल्या प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा चूक सुधारुन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये पहिल्या जाहिरातीत उपमुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापलेला नव्हता. एवढचं नाहीतर राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे असा मजकूराची जाहिरात प्रसिद्ध केली होती.

फक्त 20 किलोमीटर अगोदर मणिपूर येथे राहुल गांधींचा ताफा अडवला

त्यावर देवेंद्र फडणवीसांनी सुरुवातील काही प्रतिक्रीया दिली नव्हती पण नंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केलं होतं. त्यानंतर आता दीपक केसरकरांनी जाहिरातीबद्दल नेमकं काय झालं होतं, ते सांगितलं आहे.

Shivsena Vs Bjp : पक्षात कमी डोक्याचे लोकं, जाहिरातबाजीवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले…

केसरकर म्हणाले, प्रसिद्ध झालेली जाहिरात मुख्यमंत्री शिंदेंना दाखवू केलेली नव्हती. नंतर मुख्यमंत्री शिंदेंना जाहिरातीबद्दल सांगण्यात आलं, त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहिरात थांबवण्यास सांगितलं पण तोपर्यंत उशिर झालेला होता. कारण जाहिरात प्रिटिंगसाठी गेलेली होती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी त्यांनी जाहिरात बदलून प्रकाशित केली असल्याचं केसरकरांनी सांगितलं आहे. दरम्यान, जाहिरातीबद्दल काहीही झालं तरी भाजप आणि शिवसेना पक्ष एकत्रच राहणार असल्याचं दीपक केसरकरांना ठामपणे सांगितलं आहे.

जाहिरातीवर फडणवीस काय म्हणाले :
जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला चुकीच्या जाहिरातीबद्दल सांगितलं, आमच्यात चांगला समजूतदारपणा असून मी त्यांचा सन्मान मोडत नाही आणि तेही मला उपमुख्यमंत्री असल्याचं भासवू देत नाहीत. तसेच पक्षात काही लोकं कमी डोक्याचे लोकं असतात, ते चुका करतात.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube