फडणवीसांना जपानचा खास सन्मान; मोदीनंतर मान मिळविणारे ठरले पहिले व्यक्ती

फडणवीसांना जपानचा खास सन्मान; मोदीनंतर मान मिळविणारे ठरले पहिले व्यक्ती

Devendra Fadnavis Japan tour : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे पाच दिवसांच्या जपान दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात जपानमधील विविध खात्यांचे मंत्री, उद्योगपती, आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी, जायका व अन्य वित्तसंस्थाच्या उच्चपदस्थांच्या भेटी घेणार आहेत. काही सामंजस्य करारही होणार आहेत. पण जपान सरकारने त्यांना शासकीय अतिथी (स्टेट गेस्ट) दर्जा देऊन आमंत्रित केले आहे. यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेले महत्व व स्थान अधोरेखित होते.

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना 2013 मध्ये त्यांना हा सन्मान देण्यात आला होता. त्यानंतर देशातील कोणत्याही मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांना तो देण्यात आलेला नाही. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले तरी भाजपचे महत्व सरकारमध्ये अधिक असल्याचे ओळखून आणि केंद्रातही भाजप सरकार असल्याने जपान सरकारने फडणवीस यांना आमंत्रित केले असल्याची शक्यता आहे.

भूमिपूजन फलकाचा वाद पेटला! दंड थोपटत आशुतोष काळेंनी कोल्हेंना ललकारलंच…

संविधानातील तरतुदी पाहता उपमुख्यमंत्री पदाला मुख्यमंत्र्यांइतके वेगळे अधिकार नाहीत, अन्य कँबिनेट मंत्र्यांप्रमाणे आहेत. राज्यात सध्या दोन उपमुख्यमंत्री आहेत. फडणवीस यांच्याकडे सध्या गृह, ऊर्जा, जलसंपदा, विधी व न्याय, राजशिष्टाचार अशी खाती आहेत. जपान दौऱ्यात त्यासंदर्भातील कोणतेही मुद्दे नाहीत. पण फडणवीस यांचे देश व राज्यपातळीवरील राजकीय महत्व ओळखून जपान सरकारने त्यांना शासकीय अतिथी दर्जा देवून आमंत्रित केल्याने त्यांनी आपला अधिकार व स्थान दाखवून दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

स्वातंत्र्यदिनी फडणवीस गडचिरोलीत; इतिहासात पहिल्यांदाच शासन सिमेवरील पिपली बुरगीत

अर्थ, पायाभूत सुविधा, एमएमआरडीए, राज्य रस्ते महामंडळ, शिक्षण, आरोग्य आदी खाती शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे आहेत. त्यासंदर्भातील बाबींसाठी फडणवीस बैठका घेणार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube