भूमिपूजन फलकाचा वाद पेटला! दंड थोपटत आशुतोष काळेंनी कोल्हेंना ललकारलंच…

भूमिपूजन फलकाचा वाद पेटला! दंड थोपटत आशुतोष काळेंनी कोल्हेंना ललकारलंच…

अहमदनगरमधील कोपरगाव तालुक्यात भाजप नेते विवेक कोल्हे आणि राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे दोन्ही नेते एकमेकांसमोर उभे ठाकल्याचं दिसून आलं आहे. कोपरगावातील रस्त्याच्या भूमिपूजन फलकाच्या वादावरुन दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये चांगलीच धुमश्चक्री झाली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी आमदार काळेंनी खांद्यावर घेतल्यानंतर आशुतोष काळेंनी थेट दंडच थोपटत विवेक कोल्हेंना ललकारल्याचं चित्र दिसून आलं आहे. यावेळी कार्यकर्ते एकमेकांशी भिडले होते. पोलिसांच्या मध्यस्थीमुळे कोणताही अनूचित प्रकार घडला नाही.

स्वातंत्र्यदिनी फडणवीस गडचिरोलीत; इतिहासात पहिल्यांदाच शासन सिमेवरील पिपली बुरगीत

यावेळी दोन्ही समर्थकांत मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की झाली. काळे-कोल्हे समर्थक एकमेकांसमोर भिडले. जवळपास दोन तास हा राडा पोलिसांसमोर सुरू होता. शहर पोलिसांनी कार्यकर्त्यांना समजावण्यात प्रयत्न केला, मात्र तो फारसा यशस्वी होत नसताना दिसत नव्हता. शेवटी परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी सौम्य लाठीमार करुन जमाव पांगला तसेच नंतर पोलीस प्रशासनाने गर्दी पांगवून दिली. त्यानंतर भूमिपूजनाचे दोन्ही नेत्यांचे फ्लेक्स पालिका प्रशासनाने तात्काळ काढून घेतले.

Independence Day 2023: लालकिल्ल्यावरील सुंदर दृश्य पाहून तुमचीही छाती अभिमानाने फुलून जाईल

नेमकं प्रकरण काय?
कोपरगाव येथे नगर पालिका हद्दवाढ भागातील गवारे नगर तारांगण शॉप ते यमुना बिल्डिंग कॉर्नर ते रॉयल ड्रेम पर्यंत ७००ते ८०० मीटर डांबरीकरण करणे अंदाजित रक्कम २० लाख१७ हजार ३०० या कामाचा भूमिपूजन शुभारंभाच्या फलकावरुन हा वाद झाला आहे. स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही विकासकामांचं उद्घाटन करु शकत नाही, असं असताना कोपरगाव नगरपालिकेच्यावतीने विशेष रस्ता अनुदान निधीच्या माध्यमातून विकासकामांच्या भूमिपूजनाचा फलक लावण्यात आला. या विकासकामांचं उद्घाटन आजच करण्यात येणार होतं. मात्र, यावर आक्षेप घेत भाजप नेते विवेक कोल्हे यांनी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं.

Atul Chordia : ‘शरद पवार ते डोनाल्ड ट्रम्प’ यांच्याशी घनिष्ठ संबंध राखून असलेले उद्योगपती

कोल्हे अधिकाऱ्यांना म्हणाले, “साहेब तुम्हाला शेवटची वॉर्निंग देतोयं, नगरपालिका कोणाच्या बापाची आहे का? तुम्ही कुठल्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहात? 15 ऑगस्टलाच रस्त्याच्या कामाचं उद्घाटन ठेवलंयं. कुठलीही परवानगी नसताना विकास कामांचं उद्घाटन करायचं नाही असा जिल्हाधिकाऱ्यांचा जीआर असताना तुम्ही कुठल्या परवानग्या घेतल्या, सांगा मला उत्तर द्या” या शब्दांत कोल्हेंनी अधिकाऱ्यांना घामच फोडल्याचं दिसून आलं आहे.

WI vs IND : वेस्ट इंडिजविरुद्ध भारताने मालिका गमावली; या पराभवाची मुख्य कारणे काय ?

दरम्यान, काळे-कोल्हे कार्यकर्त्यांमध्ये या घडामोडी सुरु असतानाच आशुतोष काळे आणि विवेक कोल्हे फलकाच्या ठिकाणी दाखल झाले. दोन्ही नेते येताच समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करण्यात सुरुवात केली. त्यानंतर वाद आणखी टोकाला गेला, कोल्हे समर्थकांनी कोल्हेंना खांद्यावर घेताच आशुतोष काळेंनाही समर्थकांनी खांद्यावर घेतलं. यादरम्यान, दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याचं दिसून आलं. अखेर आशुतोष काळेंनी दंड थोपटून विवेक कोल्हे यांना ललकारल्याचं पाहायला मिळालं आहे.

तब्बल दोन तास चाललेल्या राड्यानंतर अखेर पोलिस प्रशासन अॅक्शन मोडमध्ये उतरल्याचं पाहायला मिळालं. सौम्य लाठीचार्ज करीत पोलिसांनी दोन्ही नेत्यांच्या समर्थकांचा जमाव पांगवला. त्यानंतर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी भूमिपूजनाचे फलक काढून घेतल्याचं दिसून आलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube