अजित पवार गटाने घेतली पवारांची भेट, NCP मधील हालचालींविषयी फडणवीस काय म्हणाले?

अजित पवार गटाने घेतली पवारांची भेट, NCP मधील हालचालींविषयी फडणवीस काय म्हणाले?

Devendra Fadnavis : काही दिवंसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) बंडखोरी करून शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारमध्ये सहभागी होणाऱ्या अजित पवार गटाने आज शरद पवार यांची भेट घेतली. वायबी सेंटर या ठिकाणी शरद पवार उपस्थित होते. या ठिकाणी जाऊन मंत्र्यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले आणि सोबत काम करण्याची विनंती केली. दरम्यान, अजित पवार गट शरद पवारांना भेटायला गेल्यानं राज्याच्या राजकारणात चर्चांना उधान आलं. या भेटीविषयी अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत. दरम्यान, यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावर प्रतिक्रिया दिली. (Devendra Fadnavis On ajit pawar group meeting with ncp leader sharad pawar)

आज माध्यमांशी बोलतांना फडणवीस म्हणाले, अजित पवार गटाने शरद पवारांची भेट घेणं, यात काही वावगं नाही. शरद पवार हे त्यांचे नेते आहेत. राष्ट्रवादीचे मंत्री पवारांची भेट घेऊन शकतात. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांची भेट घेणं स्वाभाविक असल्याचं फडणवीस म्हणाले.

अजित पवार गटाने शरद पवारांची भेट घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अजित पवार गट शरद पवारांच्या भेटीला का गेला? असा प्रश्न विचारताच फडणवीस म्हणाले, अजित पवार यांच्या गटातील मंत्र्यांनी शरद पवारांची ही भेट का घेतली, याबाबत मला कल्पना नसल्याचं ते म्हणाले.

विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी काँग्रेसची, त्यावर आमचा अधिकार नाही, जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितले 

दरम्यान, जयंत पाटील यांनी या भेटीविषयी बोलतांना सांगितलं की, सुप्रिया सुळेंचा मलाा फोन आला आणि अचानक अंबादास दानवेंची बैठक सोडून मी वायबी सेंटरवर आला. पक्षातून बाहेर पडलेल्या वरिष्ठ नेत्यांनी दिलगिरी व्यक्त करून काहीतरी मार्ग काढा अशी विंनंती केली. मात्र, ही भेट अनपेक्षित होती. दरम्यान, अजित पवार गटाने खंत व्यक्त केली असून यावर शरद पवार विचार करतील, असं पाटील म्हणाले.

पक्षात उभी पाडून आणि अजित पवार गटाने पक्षावरच दावा ठोकला आहे. राष्ट्रवादीत ही फुट पडलेली असतांना आज अजित पवार गटाने नाट्यमयरित्या शरद पवारांची भेट घेतली. यामध्ये स्वत: अजित पवारांसह छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे या नेत्यांचा समावेश होता. पक्ष एकत्रित राहावा, अशी अजित पवार गटाची भूमिका असल्याचं बोलल्या जातं. त्यामुळं राष्ट्रवादीतील दोन्ही गटाच्या मनोमिलनासाठी आता पुन्हा एकदा प्रयत्न सुरू झालेत का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube