उद्धव ठाकरे कोणाबरोबरही बसायला तयार; फडणवीसांचा खोचक टोला

उद्धव ठाकरे कोणाबरोबरही बसायला तयार; फडणवीसांचा खोचक टोला

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : दिल्लीचे (Delhi)मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज बुधवारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मातोश्रीवर (Matoshree)जाऊन भेट घेतली. त्यावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार निशाणा साधला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar)यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय खरिप हंगामपूर्व आढावा बैठक (State Level Kharip Pre Season Review Meeting)यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झाली त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी आज अरविंद केजरीवाल यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यावरुन प्रश्न विचारला त्यावर फडणवीसांनी त्यांच्या भेटीने काहीही फरक पडणार नसल्याचं म्हटलं आहे.

भाजपने संभाजीराजेंची विश्वासार्हता संपवली, प्रविण गायकवाडांनी स्पष्टच सांगितलं

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला अतिशय आनंद आहे की, अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांची भेट होऊन आता त्यांना एकमेकांची गरज लागतेय. म्हणजे भाजपला पराभूत करण्यासाठी केजरीवाल कोणाशीही कॉम्प्रमाईज करायला तयार आहेत आणि उद्धव ठाकरे कोणासोबतही बसायला तयार आहेत. यातूनच भाजपची ताकद दिसत असल्याचा घणाघात यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

फडणवीस म्हणाले की, मी पुन्हा सांगतो की, 2019 मध्ये या सर्वांनी हा प्रयोग करुन पाहिला आहे. वेगवेगळ्या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये हा प्रयोग करुन पाहिलेला आहे. पण हा कधीही यशस्वी झालेला नाही, असा टोलाही यावेळी फडणवीसांनी लगावला आहे.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय खरिप हंगामपूर्व आढावा बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात सुरु आहे. या बैठकीला सहकारमंत्री अतुल सावे, मत्स्य व्यवसाय दादा भुसे, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, कामगारमंत्री सुरेश खाडे उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी कृषी अधिकाऱ्यांकडून हंगामपूर्व आढावा घेतला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube